रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी

श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी (१९३४ - १९९९) साक्षात गुरूदेव दत्तात्रेयांचे अवतार आणि आद्य शंकराचार्यांच्या परंपरेतील होवून गेले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ब्रह्मचर्याचे पालन करून वेदांच्या कार्यासाठी अर्थात वेदांचे महत्त्व पुनर प्रस्थापनेसाठी, धर्माविषयीची ओढ, आस्था सर्वांमध्ये पुन्हा जागॄत करण्यासाठी, वैदिक धर्म परम्परा, वैदिक मूर्ती पूजा अशा अतिशय महत्त्वाच्या, अवघड आणि सध्याच्या काळात गरज असलेल्या कार्यांवर सर्वांना अमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी अर्पण केले. त्यांचा अवतार मुख्यत्वे धर्म सांभाळणे, धर्म समजावून सांगणे आणि वेदान्त विचारावरच धर्माची स्थापना करणे ह्या कार्यासाठी झाला. त्यांनी केलेली कार्ये सर्वांच्या आणि ह्या वसुन्धरेच्या कल्याणासाठीच होती. त्यांनी केलेल्या कार्यांपैकी काही कार्ये पुढे नमूद केलेली आहेत.

१) अनाथांना आधार देणे.(अनाथ म्हणजे ज्यांना धर्माचा योग्य मार्ग माहीत नाही आणि ज्यांना योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे असे )
२) धर्म शिकवणे - अ) वेदांचा विस्तार करणे.:
ब) वेदांची महती सर्वांना समजावणे.:
क) वेद हे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवणे.
ड) वेद हे सर्वसामान्य जनांना समजावणे.

हिच कार्ये सद्गुरु आता सर्व भक्तांकडून करून घेत आहेत, आणि त्याचा मोठा परिणाम सर्वांना काही काळात जाणवेलच.

चरित्र[संपादन]

श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामींचा जन्म शुक्रवार, दिनांक फेब्रुवारी १६, १९३४ रोजी म्हणजेच फ़ाल्गुन शुक्ल तॄतीयेला रायतळे नावाच्या छोट्याश्या खेड्यामध्ये झाला. रायतळे हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या राहुरी गावाजवळ आहे. त्यांच्या वडीलांचे नाव कॄष्ण होते. ते व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव राधा होते. त्यांचा जन्म मराठी मातॄभाषा असलेल्या ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण घराण्यात झाला. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांना परम ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव , साक्षात्काराच्या रूपाने झाला. त्यानंतर नॄसिंह सरस्वती( गाणगापूर ) स्वामींनी ( जे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार होवून गेले ) श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामींना गाणगापूरला बोलवून घेतले, आणि सदेह दर्शन दिले.नॄसिंह सरस्वती स्वामींनी श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींना शिष्य बनवले आणि त्यांना तपश्चर्या करण्यास सांगितले. सद्गुरूंची मागच्या जन्मामध्ये ९० वर्षांची तपश्चर्या झालेली होती आणि त्यांना नॄसिंह सरस्वतींनी ह्या जन्मामध्ये, अजून २५ वर्षे तपश्चर्या करण्यास सांगितले. २५ वर्षे तपश्चर्या करून झाल्यानंतर त्यांच्या गुरुदेवांनी, त्यांना आशिर्वाद दिले आणि त्यांना वेद संवर्धन , रक्षण , आणि वेदांना पुनरौपयोगात आणण्याविषयी सर्व सामान्य भक्तांना मार्गदर्शन करावयास सांगितले. वेदांसाठीचे सद्गुरूनी केलेले कार्य हे श्री आद्य शंकराचार्यांनी हजारो वर्षांपुर्वी केलेल्या कार्याचाच भाग आहे असे म्हणता येईल. स्वामीजींचे जीवन म्हणजे सम्पूर्ण ब्रम्हचर्य पाळत, कठोर व्यतीत केलेले असे जीवन होते, ज्याची तुलना थोर संत ज्ञानेश्वर आणि रामकॄष्ण परमहंसांच्या जीवनाशी करता येईल.

सद्गुरूंचे तपश्चर्येच्या काळातील तेजोमय कांती झळकणारे रूप

कार्य[संपादन]

श्री रामकॄष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामीजी हे सर्व निराधार व्यक्तींना आधार देणारे होते. ते म्हणजे साक्षात प्रेम आणि दैवी शक्तींचा अथांग सागरच. स्वामीं सर्व भक्तांना धर्मावर अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन करत असे. त्यांनी कधी धर्मसभा बोलावून नागरिकांना धर्म समजावला नाही; तर त्यांचे मार्गदर्शन म्हणजे नेहमी होणारे, त्यांच्या आणि त्यांच्या भक्तांच्यामधील अनौपचारिक आशिर्वादांचाच ठेवा. ह्या गुरू-शिष्य परंपरेमध्ये, स्वामींचे दर्शन हेच आपले अज्ञान दूर करण्यास पुरेसे असते आणि तेच आपल्याला मन:शांती आणि आनंद मिळवून देते. ह्याच गुरू-शिष्य परंपरेत, केवळ गुरूंच्या दर्शनाने नास्तिकाचे रूपांतर आस्तिक व भाविक भक्तांमध्ये होवून जाते. येवढे अधिकार आणि दैवी शक्ती ह्या ख~या गुरूंमध्ये असतात.

स्वामींनी श्री दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आणि सावेडी रोड मार्गावर वेदान्त नगरची निर्मीती केली. ह्या दोन्ही कार्यांमागे वेद संवर्धन आणि प्रसार करणे हेच उद्दिष्ट होते. सद्गुरुंनी सर्व भक्तांना वेदांचे महत्त्व , वेदान्ताची तत्वे सर्व समाजामध्ये प्रसारीत करण्यासाठी प्रोत्साहन दिले, आणि सर्व भक्तांना भिक्षेच्या रुपाने सर्वसामान्यजनांकडून निधी गोळा करण्यास सांगितले. त्यांनी सर्व भक्तांना घरोघरी जावून ह्या लोकोपकाराच्या कार्याची महती समजावून सांगण्यास सांगितले आणि इतरांना ह्या कार्यात उत्स्फ़ूर्त सहभागी होण्यासाठी विचारले. वेदांचे महत्त्व हे शब्दात व्यक्त करणे अवघडच नाही तर अशक्य आहे कारण ह्या सम्पूर्ण विश्वाची निर्मिती ही वेदांमधूनच झालेली आहे. वेदांचे पठण केल्यामुळे सध्या भेडसावत असलेल्या अवती-भवतीच्या सर्व समस्या ज्या मानवाच्या अवाक्याबाहेर आहेत आणि ज्यांमुळे मोठयाप्रमाणावर जिवीत हानी होवू शकते ऊदा. भूकंप, सूनामी, ज्वालामुखी आणि इतर या सर्वांचे निराकारण होवू शकते. वेद पठणांद्वारा सर्व दुष्परीणामांपासून मुक्तता मिळवता येते.ऊदा. प्रदूषणाचे दुष्परिणाम, अतिवॄष्टी, चक्रीवादळे आणि इतर. ह्या वेदकार्याला भक्तांमध्ये आणि कार्यामध्ये शिस्त रहावी, म्हणून स्वामींनी सर्व भक्तांना वेगवेगळ्या भागांमध्ये सत्संग मंडळे स्थापन करण्यास सांगितले. सद्य-स्थितीत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या शहरांमध्ये मिळून २० सत्संग मंडळे आहेत. नविन सत्संग मंडळे वेगवेगळ्या शहरांमध्ये निर्माण होत आहेत. अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा ह्या लोकोपकार कार्यांसाठी सत्संग मंडळांची स्थापना झालेली आहे.

गुरूपरंपरेत पादूका दर्शनाला अनन्यसाधारण असे महत्च आहे. श्री नॄसिंह सरस्वतींच्या दत्त देवस्थानातल्या पादूकांचे किंवा श्री सद्गुरू क्षीरसागर सरस्वती स्वामींच्या फ़ोटोचे दर्शन, तोच आध्यात्मिक अनुभव मिळवून देतो, जो सर्व भक्तांना सद्गुरूंच्या सदेह दर्शनामधून पूर्वी मिळत असे. सद्गुरूंनी १९९९ साली देहाचा त्याग केला आणि ती निर्देही शक्ती आता निर्गुण आणि निराकार रूपाने सर्वांना मार्गदर्शन करते आणि करत राहील, ह्यात काहीच शंका नाही.

गुरू आशिर्वाद[संपादन]