प्रॉक्झिमा सेन्टॉरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रॉक्झिमा सेन्टॉरी

प्रॉक्झिमा सेन्टॉरी (लॅटिन प्रॉक्झिमा, म्हणजे शेजारचा किंवा जवळचा) हा नरतुरंग तारकासमूहातील एक रक्तवर्णी बटुतारा आहे. तो सूर्यापासूनचा सर्वांत जास्त जवळचा तारा असून त्याचे सूर्यापासूनचे अंतर ४.२ प्रकाशवर्षे आहे. प्रॉक्झिमा ताऱ्याची तेजस्विता सूर्याच्या ०.१५ टक्के, त्रिज्या सूर्याच्या १४ टक्के आणि वस्तूमान सूर्याच्या १२ टक्के आहे.[१]

ऑगस्ट २०१६ मध्ये या ताऱ्याभोवती नव्या पृथ्वीसदृश ग्रहाचा शोध लागला. या ग्रहाचे वस्तूमान अंदाजे पृथ्वीच्या १.३ पट आहे. हा ग्रह प्रॉक्झिमाभोवती ११.२ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि त्याचे ताऱ्यापासूनचे सरासरी अंतर ०.०५ खगोलीय एकक आहे. त्याचबरोबर त्याच्या पृष्ठभागाचे तापमान पाणी द्रवरूपात आढळण्यासाठी अनुकूल असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Anglada-Escudé, Guillem; Amado, Pedro J.; Barnes, John; Berdiñas, Zaira M.; Butler, R. Paul; Coleman, Gavin A. L.; de la Cueva, Ignacio; Dreizler, Stefan; Endl, Michael; Giesers, Benjamin; Jeffers, Sandra V.; Jenkins, James S.; Jones, Hugh R. A.; Kiraga, Marcin; Kürster, Martin; López-González, Marίa J.; Marvin, Christopher J.; Morales, Nicolás; Morin, Julien; Nelson, Richard P.; Ortiz, José L.; Ofir, Aviv; Paardekooper, Sijme-Jan; Reiners, Ansgar; Rodríguez, Eloy; Rodrίguez-López, Cristina; Sarmiento, Luis F.; Strachan, John P.; Tsapras, Yiannis; Tuomi, Mikko; Zechmeister, Mathias (25 August 2016). "A terrestrial planet candidate in a temperate orbit around Proxima Centauri". Nature (इंग्रजी भाषेत). 536 (7617): 437–440. doi:10.1038/nature19106. ISSN 0028-0836.
  2. ^ Witze Alexandra. "Earth-sized planet around nearby star is astronomy dream come true" (इंग्रजी भाषेत). pp. 381–382. doi:10.1038/nature.2016.20445. 24 August 2016 रोजी पाहिले.