प्रेरणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

प्रेरणा म्हणजे.... प्रेरणा कुठुन.... प्रेरणा कशी....प्रेरणा

जिंकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो.यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते . जन्मतः मुलांना आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते.किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते. कुटुंबातील इतर व्यक्ती देखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी कारणीभूत ठरतात.अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो.

अनुकरणाबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवाची गरज आहे .परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे हा देखील स्वप्रेरणेचा भाग आहे .

मूल शाळेत जाऊ लागले की हळूहळू मित्रमैत्रीण ,शिक्षक,आजूबाजूचा परिसर ,समाज वातावरण कळत नकळतपणे प्रेरणा देत असतात .

प्रेरणा म्हणजे साधारणतः आपण Motivation असे म्हणतो . पण ,प्रेरणा म्हणजे नक्की काय ?? प्रेरणा म्हणजे स्फूर्ती देणे होय . प्रेरणा म्हणजे चालना देणे .. प्रेरणा म्हणजे शिक्षणाचे हृदय .. साध्यापर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे प्रेरणा .. एखादी क्रिया करण्यासाठी लागणारे बळ म्हणजे प्रेरणा .. रोजमर्रा आयुष्यात आपण प्रेरणा हा शब्दप्रयोग करतो.अनेक मानसशास्त्रद्न्य,विचारवंत ,लेखक यांचा अगदी आवडीचा आणि जवळचा विषय म्हणजे प्रेरणा ... आज आपण जगभर प्रसिद्ध अशा विचारवंतांच्या वैविध्यपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या प्रेरणेच्या व्याख्या पाहणार आहोत . आपल्या बुद्धीला पटेल आणि झेपेल एवढाच विचार आपण एखाद्या विषयाचा करतो ,आणि स्वतःभोवती काही मर्यादांचे कुंपण आखून घेतो . हे मर्यादांचे कुंपण म्हणजेच प्रगतीच्या मार्गातील भलामोठा अडथळा ..!!

आपण या लेखपुष्पात प्रेरणा या विषयाचा अगदी जवळून ,अंतर्बाह्य आणि सांगोपांग विचार करणार आहोत .. सर्वप्रथम प्रेरणा यावर मॅगडुगल,सिगमंड फ्राईड ,अब्राहम मास्लो यांनी मोलाचे योगदान दिले आहे .त्याचबरोबर स्किनर,वुडवर्थ,गिलफोर्ड , एडकिन्सन यांच्या व्याख्या देखील प्रेरणा या विषयावर प्रकाशझोत टाकतात .

स्किनर -शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रेरणा.

मॅकडुगल-शारीरिक आणि मनोवैज्ञानिक अवस्था जी कोणतेही कार्य करण्यास आपणास प्रेरित करते.

एच.डब्ल्यू .बेनार्ड - एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी दिले जाणारे उत्तेजन म्हणजे प्रेरणा .

एम.सी .मॅकडोनाल्ड - अभिप्रेरणा म्हणजे व्यक्तीच्या अंतर्मनात होणारे शक्ती परिवर्तन होय .जी भावात्मक जागृती किंवा पूर्वानुमान उद्देश व प्रतिक्रियांद्वारे वर्णन करता येते .

जॉन्सन - अभिप्रेरणा ही सामान्य क्रियांचा प्रभाव आहे जो प्राण्यांच्या व्यवहारास प्रेरक ठरतो आणि आपणास मार्ग आणि दिशा निर्देश करतो .

अशाप्रकारे प्रेरणा म्हणजे काय याच्या व्याख्यांवरून प्रेरणेचे ढोबळ स्वरूप लक्षात येते.

प्रेरणा मिळण्याची मुख्य ठिकाणे किंवा प्रेरणा स्रोत एकूण चार आहेत. गरज भासणे हा पहिला प्रेरणास्रोत आहे . शरीराच्या आवश्यकता तणाव निर्माण करतात . तहान ,भूक ,काम क्रोध,मलमूत्र या शारीरिक,प्राथमिक आणि स्वाभाविक अभिप्रेरणा आहेत . त्यानंतर पुढील स्रोत म्हणजे चालक, प्रेरक आणि उद्दीपक असे आहेत . भूक लागल्यावर स्वतः प्रयत्न करणे हीच चालक बनण्याची अवस्था होय . उद्दीपन म्हणजे प्रोत्साहन होय . प्रेरक म्हणजे motive . विशिष्ट उद्दिष्ट ठरवून मार्गस्थ होण्याच्या प्रक्रियेला प्रेरक म्हणतात.

आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा असे मुख्य दोन प्रकार आहे . आंतरिक प्रेरणा ही जन्मजात असते . सतत काहीतरी करण्याची उर्मी म्हणजे आंतरिक प्रेरणा. अभिरुची, आवड ,अभिवृत्ती ,तत्परता यातून आंतरिक प्रेरणा मिळते . काही लोकांना आंतरिक प्रेरणा साध्याप्रती उद्युक्त करते.आपण आजूबाजूला पाहतो ,काही माणसे धडपडत असतात.आंतरिक प्रेरणेमुळे ते कोणता ना कोणता ध्यास घेऊन कार्यरत असतात. काहीतरी क्रिया,काम वारंवार केल्याने यांना यश आणि संकटे पावलोपावली भेटत जातात. एखादे काम करत असताना जेवढी अधिक संकटे येतील तेवढे अधिक शिकावयास मिळते . संकट ,बाधा ,अडचणींतून शिकण्याचे नवनवीन मार्ग सापडतात.म्हणजेच आंतरिक प्रेरणेतून क्रियाशील व्यक्तींना यशाच्या वाटा खुणावत असतात.आधीच हे लोक आंतरिक प्रेरणेने झपाटलेले असतात ,त्यात वाटेवर एखादा हिरा चमकावा तसे हि प्रेरणा हिरीरीने उद्देश्या प्रति आपणास पाऊल टाकावयास भाग पाडते .

प्रेरणेचा दुसरा प्रकार म्हणजे बाह्य प्रेरणा .. प्रत्येकालाच अंतःप्रेरणेने झोडपलेले असते असे नाही ,काहींना बाह्य प्रेरणेची चावी दिल्यास ते देखील यशाच्या वाटेवर सुसाट पळू लागतात .

बाह्य प्रेरणा म्हणजे प्रोत्साहन (Incentive )देणे होय.उदेश्याप्रती एखाद्याचे लक्ष खेचून आणणे म्हणजे बाह्यप्रेरणा . याशिवाय पुरस्कार ,बक्षीस ,दंड ,प्रशंसा ,निंदा ,सहयोग ,हे बाह्य प्रेरणेचे घटक आहेत.

आंतरिक प्रेरणेस थॉमसन यांनी स्वाभाविक प्रेरणा असे म्हंटले तर बाह्य प्रेरणेस कृत्रिम प्रेरणा म्हंटले आहे .

गेरेट मनोवैज्ञानिक म्हणतात की मनाच्या विविध अवस्थांमुळे आपणास प्रेरणा मिळते . भय ,कामक्रोध ,सुखदुःख यांमुळे आपण उत्तेजित होऊन कार्य करण्यास उद्युक्त होतो . थोडक्यात तणाव ,बाधा ,पीडा ,उपेक्षा ,निंदा ,अपमान यांमुळे देखील एखादे मोठे आवाहन पेलण्यास आपण तयार होतो .. म्हणून मनाच्या या अवस्था प्रेरणा स्रोत आहेत . भर सभेत एखाद्याचा अपमान झाल्यामुळे देखील प्रचंड चीड येऊन कार्यास ती व्यक्ती उद्युक्त होते . आत्मप्रदर्शन ,दिखावा ,प्रौढी मिरवणे हे देखील सामाजिक प्रेरणा स्रोत आपणास मानता येतात .

मॅगडुगल यांनी प्रेरणेचे आठ घटक एकत्रित पणे सांगितले आहेत .

काही माणसे आपल्याला भेटतात आणि नेहमी म्हणतात की मला खूप मोठे व्हायचे आहे ,पण नेमके काय करावे हे कळत नसते . यांना एकच सांगावेसे वाटते की प्रत्येकामध्ये प्रेरणा या निरनिराळ्या असू शकतात . फक्त अभ्यासात प्राविण्य मिळविणे म्हणजे बुद्धिमान असणे असे जणू एक समीकरण बनले आहे.प्रत्येक सजीवात एखादा बुद्धीचा घटक म्हणजेच एखादी कला ,कौशल्य असतेचं... फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे . एकदा का हे कलागुण ओळखले गेले मग बाह्य प्रेरणेची गरज भासत नाही . आपल्या मुलांच्या रोजच्या वागण्याबोलण्यातून पालक ,शिक्षक व मित्रमंडळींना पाल्यातले एकूणच कलागुण ओळखता आले पाहिजे . एखाद्या मुलामध्ये सद्यस्थितित कोणताही गुण अथवा आंतरिक प्रेरणा दिसत नसल्यास दोन गोष्टी करावयास हव्यात .. १) बाह्य प्रेरणा म्हणजेच प्रोत्साहन, बक्षिसे, प्रशंसा ( वर नमूद केलेले घटक )करावी . २)मोकळ्या ,निसर्गरम्य वातावरणात पाल्यास ठेवून मूल कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होते ते निरीक्षण करणे .


निरनिराळे प्रेरणेचे डोस देऊन आपल्या पाल्याचे बौद्धिक आरोग्य घरबसल्या सुधारण्याची संधी आज या लेखातून देत आहे.

हर्षदा जोशी ,पुराणिक

मानवेतर सजीवांच्या प्रेरणा[संपादन]

मूलभूत प्रेरणा[संपादन]

  • जैविक प्रेरणा :भूक ,लैंगिक वासना, तहान,झोप,
  • जगण्याची अंत:प्रेरणा
  • नवनिर्मितीच्या प्रेरणा

प्रेरणांचे उगमस्थान[संपादन]

प्रेम

चेतना, भावना आणि प्रेरणा, व्यक्त-अभिव्य्क्त होणे, यातील परस्पर सहसंबध[संपादन]

अन्त:प्रेरणा[संपादन]

मानसशास्त्रीय दृष्टीकोण[संपादन]

प्रेरणा, बौद्धीकसंपदेची निर्मिती[संपादन]

नक्कल आणि स्वयंप्रेरणेतील फरक[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

स्रोत[संपादन]