प्रेमचंद रंगशाळा
प्रेमचंद रंगशाळा | |
---|---|
मागील नावे | {{{मागील नावे}}} |
स्थान | राजेंद्र नगर - ८०० ०१६, भारत |
प्रेमचंद रंगशाळा हे पटना, बिहार, भारत येथे स्थित एक थिएटर आहे. ते राजेंद्र नगर येथे आहे.[१]
इतिहास
[संपादन]हे स.न. १९७१ मध्ये बिहार सरकारने स्थापित केले होते. पूर्व भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटगृहांपैकी एक आहे. १९७२ नंतर सभागृहात एकही नाटक सादर झाले नाही आणि १९७४ मध्ये ते केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आले. १९८७ मध्ये, सांस्कृतिक कार्यकर्त्यांनी सतत दबाव आणल्यानंतर सभागृह सीआरपीएफपासून मुक्त करण्यात आले. त्यानंतर ठराविक अंतराने यात नाटके रंगली.[२]
२०११ मध्ये, थिएटरचे मोठे नूतनीकरण झाले. एकूण नूतनीकरणाचा खर्च अंदाजे ५.९१ कोटी इतका होता. २०१२ पर्यंत १०० नवीन जागा जोडण्यात आल्या. त्या आधी तेथे ५०० जागेची क्षमता होती. थिएटरची रचना देखील सुधारली गेली.[३] नूतनीकरणानंतर, अत्याधुनिक थिएटरचे उद्घाटन फेब्रुवारी २०१२ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.[४]
हे सुद्धा पहा
[संपादन]- कालिदास रंगालय
- भारतीय नृत्य कला मंदिर
- रवींद्र परिषद
संदर्भ
[संपादन]- ^ Amit Bhelari (2012-04-23). "New road to ease Ashok Rajpath snarls". Telegraphindia.com. 2014-04-27 रोजी पाहिले.
- ^ Correspondent, Our (2012-01-13). "Return of arclight on new-look rangshala - Yahoo News India". In.news.yahoo.com. 2014-04-27 रोजी पाहिले.
- ^ "Premchand Rangshala set to get a fresh look - The Times of India". Timesofindia.indiatimes.com. 2011-05-05. 2014-04-27 रोजी पाहिले.
- ^ Our Correspondent (2012-01-13). "Return of arclight on new-look rangshala". Telegraphindia.com. 2014-04-27 रोजी पाहिले.