प्राइड अँड प्रेज्युडीस
Appearance
प्राइड ॲंड प्रेज्युडीस | |
लेखक | जेन ऑस्टेन |
भाषा | इंग्लिश |
देश | युनायटेड किंग्डम |
साहित्य प्रकार | शिष्टाचार, उपहास |
प्रथमावृत्ती | २८ जानेवारी १८१३ |
प्राइड अँड प्रेज्युडीस (इंग्लिश: Pride and Prejudice) ही जेन ऑस्टेनने लिहिलेली व १८१३ साली प्रकाशित झालेली एक कादंबरी आहे. ह्याचे कथानक १९व्या शतकामध्ये इंग्लंडच्या हर्टफर्डशायर येथील एका काल्पनिक गावात राहणाऱ्या एलिझाबेथ बेनेट ह्या पात्राभोवती घडते.
प्राइड अँड प्रेज्युडीस हे आजवरच्या जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय इंग्लिश पुस्तकांपैकी एक मानले जाते. २०० वर्षे जुने कथानक असूनही आजही ह्या कादंबरीची लोकप्रियता टिकून आहे. प्राइड अँड प्रेज्युडीसचे अनेक वेळा नाटके, धारावाहिक मालिका, चित्रपट इत्यादींमध्ये रूपांतर केले गेले आहे. २००५ साली प्रदर्शित झालेला व कियेरा नाइटलीची प्रमुख भूमिका असलेला ह्याच नावाचा चित्रपट देखील प्रचंड यशस्वी झाला.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत