प्रल्हाद अनंत धोंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रल्हाद अनंत धोंड
पूर्ण नावप्रल्हाद अनंत धोंड
जन्म नोव्हेंबर ११, १९०८
रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत
मृत्यू एप्रिल २१, २००१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला, कलाअध्यापन

प्रल्हाद अनंत धोंड (नोव्हेंबर ११, १९०८ - एप्रिल २१, २००१) हे मराठी चित्रकार होते. जलरंगांतील समुद्रदृश्ये चितारण्याकरता त्यांची विशेष ख्याती होती.

जीवन[संपादन]

नोव्हेंबर ११, १९०८ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरीत त्यांचा जन्म झाला. १९३४ साली त्यांनी जी.डी.आर्ट हा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पुरा केला. सुरुवातीला पुण्याच्या सैनिकी शाळेत त्यांनी कलाअध्यापकाचे काम केले.
एप्रिल २१, २००१ रोजी त्यांचे कर्करोगाने निधन झाले.