Jump to content

विष्णुपंत गोविंद दामले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विष्णूपंत गोविंद दामले या पानावरून पुनर्निर्देशित)

विष्णूपंत गोविंद दामले (ऑक्टोबर १४, इ.स. १८९२ - जुलै ५ इ.स. १९४५) हे भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी निर्मिलेल्या "संत तुकाराम" हा चित्रपट व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाणारा पहिला भारतीय चित्रपट होता.[]

विष्णूपंत दामले हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या प्रभात फिल्म कंपनीचे एक संस्थापक होते, आणि पाच मालकांपैकी एक होते. दामलेमामा म्हणून ते लोकांमध्ये प्रसिद्ध होते.संत तुकाराम' आणि संत ज्ञानेश्वर' या प्रसिद्ध चित्रपटांच्या दामले-फत्तेलाल या दिग्दर्शकद्वयीतले एक एवढीच त्यांची ओळख नसून, ते चित्रपट-यंत्रतंत्र विकसित करणारे तंत्रज्ञ, वास्तुरचनाकार, आणि शिस्तशीर व सत्शील व्यावसायिक होते.

चित्रपटाशी संबंध येण्यापूर्वी दामलेमामा मुंबईच्या नाट्यसृष्टीत चित्रकार होते. इ.स. १९११साली आनंदराव पेंटर आणि बाबुराव पेंटर या दोघांनी त्यांना कोल्हापूरला डेक्कन टॉकीजच्या कामासाठी बोलावून घेतले, आणि त्यानंतर विष्णूपंत दामले यांचे आयुष्य चित्रपटसृष्टीशी जखडून गेले.

फत्तेलाल-दामले या जोडगोळीने निर्माण करून दिग्दर्शित केलेले चित्रपट

[संपादन]
  • अमृतमंथन
  • गोपालकृष्ण
  • रामशास्त्री
  • संत तुकाराम
  • संत सखू
  • संत ज्ञानेश्वर

अधिक वाचनासाठी

[संपादन]
  • दामलेमामा : चरित्रपट आणि चित्रपट (लेखिका - मंगला गोडबोले)[]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2012-11-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-25 रोजी पाहिले.
  2. ^ सुषमा दातार (१५ सप्टेंबर २०१३). "पाचांमुखी दामलेमामा'!". लोकसत्ता. १९ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.