Jump to content

प्रकाश गोळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. प्रकाश गोळे (जन्म : इ.स. १९३८; - पुणे, २७ नोव्हेंबर २०१३) हे एक मराठी पर्यावरणतज्ज्ञ, पक्षितज्ज्ञ आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक होते.

पूर्वायुष्य आणि शिक्षण

[संपादन]

प्रकाश गोळे यांचे घराणे हे पेशवेकालीन सरदार घराणे होते. पुण्याच्या शनिवार पेठेतील गोळे वाड्यात ते रहात. त्यांचेव महाविद्यालयीन शिक्षण स.प. महाविद्यालयातून झाले. मूळचे ते कला शाखेचे विद्यार्थी. अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास हे विषय घेऊन बी.ए. आणि नंतर अर्थशास्त्र विषयाची एम.ए. पदवीही त्यांनी संपादन केली. विशेष म्हणजे त्याच काळात त्यांनी ‘इतिहास’ विषयावर एक पुस्तक लिहिले होते,

कॉलेजच्या दिवसांपासूनच प्रकाश गोळे यांना प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल प्रेम वाटू लागले. पुढे त्यांना पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

डॉ. प्रकाश गोळे यांनी पुण्यात १९८२ साली ’इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली. सोसायटीच्या करवी त्यांनी नैसर्गिक पुनर्जीवनाचे असंख्य प्रयोग केले. त्यांच्या या संस्थेने निसर्ग संवर्धनावरील पदव्युत्तर पदविकेचा एक वर्षाचा अभ्यासक्रम विकसित केला आहे. हा मूलस्रोताच्या व्यवस्थापनाचा अभ्यास पुढे सरकारमान्य झाला. मात्र गोळे यांचा पर्यावरणीय अर्थशास्त्राचा विचार प्रस्थापित सरकारच्या गळी उतरवण्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी राजकीय पक्षांसाठी एक ’पर्यावरण प्रश्नांचा जाहीरनामा’ काढला होता. डॉ. प्रकाश गोळे यांचे अतिशय्म्प्ठेकार्य म्हणजे त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी सकारात्मक काम करणारे असंख्य तरुण कार्यकर्ते निर्माण केले आहेत.

डॉ. गोळे यांच्या संस्थेने सारस क्रौंच आणि पट्टे कादंब हंस (Bar Headed Gill) या पक्ष्यांचा अभ्यास केला. माळढोक पक्ष्यांवरही संशोधन केले.

डॉ. प्रकाश गोळे यांनी

  • पुण्याजवळच्या पानशेत धरणाच्या मागील पडीक जमिनीचा नैसर्गिक पद्धतीने पुनर्जीवन केले. तेथे आता ५० चौरस किलोमीटरचे जंगल आहे.
  • चासकमान ध्रणातील मासेमारीचे प्रारूप सिद्ध केले.
  • सातारा जिल्ह्यातील विंचुर्णी गावातील गवताळ कुरणाच्या संवर्धनासाठी त्यांनी यशस्वी प्रयोग केले.
  • पुण्यातील बंडगार्डनजवळ नदीकिनारी एका खासगी जागेत पक्षी अभयारण्य उभारले.
  • महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत ’निर्मल गंगा’ नावाच्या अभियानाद्वारे अनेक नैसर्गिक झऱ्यांचे व ओढ्यांचे गावकऱ्यांच्या साहाय्याने पुररुज्जीवन केले.
  • ’जर्नल ऑफ इकॉलॉजिकल सोसायटी’द्वारा अनेक शोधनिबंध प्रकाशित केले.
  • अरुणाचल प्रदेशातील क्रौंच पक्ष्याच्या पहिल्या अभयारणाच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले.

लेखन

[संपादन]
  • अंडरस्टॅन्डिंग रिॲलिटी (इंग्रजी)
  • कथा कोकण किनाऱ्याची
  • निसर्गाच्या अशा वाटा
  • पर्यावरणीय अर्थशास्त्राची अत्यंत शास्त्रशुद्ध मांडणी करणारी अनेक इंग्रजी-मराठी पुस्तके.
  • रानवा
  • रिस्टोरेशन ऑफ नेचर (इंग्रजी)

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • सहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोळे यांना "वसुंधरा जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (२३-२-२०१२)
  • पानशेत धरणाच्या मागील जमिनीच्या केलेल्या विकासाबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार
  • आंतरराष्ट्रीय क्रौंच फाउंडेशनचे सभासदत्व
  • जगातल्या पहिल्या वेटलॅंड मॅनेजमेंट कमिटीचे सभासदत्व


(अपूर्ण)