पेपिता शेठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पेपिता शेठ (??:सफोक, इंग्लंड - ) या भारतीय लेखिका आणि छायाचित्रकार आहेत. त्यांनी केरळच्या देवळांतील कला आणि व्रतवैकल्यांबद्दल पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी काढलेली गुरुवायूर केशवन या हत्तीची चित्रे प्रसिद्ध आहेत.

कौटुंबिक माहिती[संपादन]

शेठ यांचा जन्म इंग्लंडच्या सफोक शहरात झाला. तत्कालीन रिवाजानुसार शेठ यांना शालेय शिक्षण मिळाले नाही. त्यांनी चित्रपट संकलनाचे प्रशिक्षण घेतले व टेड कॉट्चेफस्टॅन्ली डॉनेन सारख्या दिग्दर्शकांसाठी काम केले. त्यांचे एक पणजोबा ब्रिटिश भारतातील सैनिक होते. १९७०च्या सुमारास त्यांची रोजनिशी शेठ यांच्या हाती लागली. आपल्या पणजोबांचा भारतातील प्रवास अनुभवून त्याबद्दल लिहिण्यासाठी शेठ १९७०मध्ये कोलकात्यास आल्या. त्यांनी मूळ भारतीय असलेल्या ब्रिटिश अभिनेता रोशन शेठ यांच्याशी लग्न केले परंतु १९८०च्या दशकात ते वेगळे झाले.

गुरुवायूर[संपादन]

आपल्या भारताच्या प्रवासात त्या गुरुवायूर येथे आल्या व तेथील मंदिरांतील कलेने प्रभावित झाल्या. पुढील नऊ वर्षे तेथे भेटी दिल्यावर त्या गुरुवायूरला स्थायिक झाल्या. त्या परदेशी असल्याने त्यांना तेथील देवळांत प्रवेश नाकारण्यात आला परंतु त्यांनी पिच्छा पुरविल्यावर शेवटी देवळाच्या पुजाऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला. आजतगायत तेथे प्रवेश करणाऱ्या त्या एकमेव परदेशी महिला आहेत. त्या गुरुवायूर येथेच राहतात.