पुष्कराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुष्कराज ((Yellow Sapphire)) हे रत्न भारतात प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. जन्मपत्रिकेत गुरूबळ नसता हे रत्न अंगठीत घालण्याचा सल्ला दिला जातो.

आढळ[संपादन]

पुष्कराज अफगाणिस्तान, अमेरिका, भारत, श्रीलंका, मादागास्कर आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी खाणींमध्ये सापडतो. हा जगातल्या अतिशय कठीण पदार्थापैकी एक आहे. पैलू पाडलेला पुष्कराज बराच महाग असतो.

किंमत[संपादन]

जेथे पुष्कराज सापडला त्या खाणी सहित सर्व माहिती दिली असेल, तर किंमत किमान पन्नास हजार रुपये प्रति कॅरेट इतकी असते. (इ.स.२०१५) पुष्कराज कुठे सापडला ही माहिती महत्त्वाची, कारण त्यानुसार त्याची घडण ठरलेली असते. मग सत्यता पडताळणी सहज होते. पुष्कराज या रत्नाची उपलब्धता मात्र आहे. फक्त किंमत मोजावी लागते. अन्यथा उगाच काचेचे खडे घालून लोक बदल घडायची वाट पाहात बसतात. तसे व्हायला नको म्हणून प्रयोगशाळेत तपासून घेतल्याचे प्रमाणपत्र असलेले रत्न घ्यावे.

प्रमाणपत्र[संपादन]

  • १. Gemological Institute of India (GII) मुंबई
  • २. Indian Gemological Institute Mumbai
  • ३. Institute of Diamond Trade (IDT) Mumbai

यांपैकी एका संस्थेचे असावे.

परिणाम[संपादन]

किमान साडेतीन कॅरेटचा पुष्कराज घातला तर परिणाम जाणवतात. जातक वापरणारा सात्त्विक मनोवृत्तीने कार्य करू लागतो. त्याची सदसद्विवेकबुद्धी जागृत होते. माया विरते, आजूबाजूच्या जगाचा खरा उलगडा होऊ लागतो. जातक स्थितप्रज्ञ होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागतो. जर खरा पुष्कराज घेण्याइतके पैसे नसतील तर गुरू उपासना करावी. मनापासून केलेली उपासना ही तेवढीच फलदायी असते.