अंगठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंगठी

अंगठी हाताच्या बोटांत घालायचा दागिना आहे. पुरुष आणि स्त्रिया, दोघेही अंगठी धारण करू शकतात. सहसा अंगठ्या सोने, चांदी, प्लॅटिनम, इ. मौल्यवान धातूंच्या असतात. अंगठ्या वळ्यांसारख्या गोलाकार किंवा एका बाजूस सपाट पृष्ठभाग आणि नक्षी असलेल्या असतात. अनेकदा या सपाट पृष्ठभागावर कोंदण करून त्यात मौल्यवान खडेही बसविले जातात. अंगठीच्या पृष्ठभागावरील नक्षीमध्ये स्वतःची ओळख पटविणारी चिह्ने घालून त्याचा उपयोग मोहोर किंवा शिक्का म्हणून होत असे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. http://www.marathivishwakosh.in/index.php?id=861 मराठी विश्वकोश