पुनीत बालन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुनीत बालन
Punit Balan.jpg
निवासस्थान पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा उद्योजक, क्रिकेटर, चित्रपट निर्माते व सामाजिक कार्यकर्ते.
संकेतस्थळ
www.punitbalan.com

पुनीत बालन हे भारतीय उद्योजक, चित्रपट निर्माते [१] [२], क्रिकेटर[३] व सामाजिक कार्यकर्ते [४] आहेत. ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योजक एस. बालन यांचे ते सुपुत्र आहेत. [५] श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे ते उत्सवप्रमुख आहेत. [६] [७]

चित्रपट निर्मिती[संपादन]

मुळशी पॅटर्न या चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन यांनी केली असून, बॉलीवूडचे अभिनेते सलमान खान [८] या चित्रपटाची निर्मिती हिंदीत करत आहेत. [९] [१०] [११] [१२]

इंद्राणी बालन फाउंडेशन[संपादन]

शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत [१३], ग्रामीण भागातील निराधार, गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना सायकल, संगणक, दप्तर पुरवून भावी पिढीला ताकद देण्याचे काम इंद्राणी बालन फाउंडेशन तर्फे केले जाते. पुनीत बालन इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष्य आहेत.

श्रीमती इंद्राणी बालन सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर[संपादन]

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांनाही विज्ञान या विषयात गोडी निर्माण व्हावी यासाठी पुनीत बालन यांनी ‘आयसर’च्या परिसरात ४० हजार चौरस फुटांच्या जागेत 'श्रीमती इंद्राणी बालन सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर' या प्रयोगशाळा बांधली, [१४] या केंद्रात विज्ञानातील प्रयोगांच्या सादरीकरणासह व्याख्याने, विज्ञान प्रदर्शने असे उपक्रम राबवले जातात. [१५]

ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव २०२०[संपादन]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशउत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव २०२० हि संकल्पना प्रथमच प्रत्यक्षात आणली, शंकर महादेवन, राकेश चौरसिया, अजय अतुल, प्रवीण तरडे, नंदेश उमप, मृणाल कुलकर्णी, भार्गवी चिरमुले, श्रुती मराठे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे असे अनेक नामवंत कलाकार यात सहभागी झाले, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुनीत बालन यांच्यातर्फे भाविकांना ऑनलाइन दर्शन सुविधा उपलब्ध करण्यात आली. [१६] [१७] [१८]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Punit Balan Entertainment Private Limited Information - Punit Balan Entertainment Private Limited Company Profile, Punit Balan Entertainment Private Limited News on The Economic Times". The Economic Times. 2019-12-19 रोजी पाहिले.
 2. ^ "Producer Punit Balan is excited as his movie 'Mulshi Pattern' getting Bollywood remake". The Asian Age. 2019-12-19 रोजी पाहिले.
 3. ^ admin. "Cobras announce Associate Sponsor S Balan Group – Cape Cobras" (इंग्रजी भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.
 4. ^ "एन्काउंटरप्रकरणातील पोलिसांना ब्रेव मेन पुरस्कार देणार | eSakal". www.esakal.com. 2019-12-19 रोजी पाहिले.
 5. ^ "उद्योजक एस. बालन यांना श्रद्धांजली" Check |दुवा= value (सहाय्य). https. 2019-12-19 रोजी पाहिले.
 6. ^ "गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते भिडणार 'फ्रेन्डशिप टी २० कप' साठी - Maharashtra Vishva News". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.
 7. ^ "गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते भिडणार 'फ्रेन्डशिप टी २० कप' साठी - Maharashtra Vishva News". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.
 8. ^ "Salman Khan to make Hindi remake of Punit Balan's Marathi movie 'Mulshi Pattern'Photos - Marathi-Movies-The Times of India Photogallery". photogallery.indiatimes.com. 2019-12-19 रोजी पाहिले.
 9. ^ "Hindi Remake Of Punit Balan's Marathi Movie 'Mulshi Pattern' On The Cards". News18. 2019-12-19 रोजी पाहिले.
 10. ^ "Producer Punit Balan is excited as his movie 'Mulshi Pattern' getting Bollywood remake - Asian Age". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.
 11. ^ "Hindi Remake Of Punit Balan's Marathi Movie 'Mulshi Pattern' On The Cards". in.style.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.
 12. ^ Desk, IBT Entertainment. "Producer Punit Balan excited as Salman Khan to remake his movie Mulshi Pattern in Bollywood". International Business Times, India Edition (english भाषेत). 2019-12-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 13. ^ "हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत | eSakal". www.esakal.com. 2019-12-19 रोजी पाहिले.
 14. ^ "गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 'इन्फोसिस'तर्फे 'आयसर'ला ५ कोटींचा निधी". Loksatta. 2019-12-19 रोजी पाहिले.
 15. ^ "सावली झाली पायांखाली गडप (व्हिडिओ) | eSakal". www.esakal.com. 2019-12-19 रोजी पाहिले.
 16. ^ "पुणेकरांनो, यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे प्रत्यक्ष दर्शन नाही! | eSakal". www.esakal.com. 2020-08-12 रोजी पाहिले.
 17. ^ samruddhi (2020-08-12). "श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती संस्थेचा ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव". Kesari (इंग्रजी भाषेत). 2020-08-12 रोजी पाहिले.
 18. ^ author/online-lokmat (2020-08-11). "सांस्कृतिक महोत्सवासह 'श्रीं'च्या दर्शनाचा ऑनलाईन लाभ ;श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा निर्णय". Lokmat. 2020-08-12 रोजी पाहिले.