पुंतारेनास प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुंतारेनास हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या काठी आहे. याच्या उत्तरेस ग्वानाकास्ते प्रांत, इशान्येस अलाहुएला, सान होजे आणि लिमोन प्रांत तर दक्षिणेस पनामा आहेत. या प्रांताच्या पूर्वेस प्रशांत महासागर आहे. कोस्ता रिकाचा जवळजवळ सगळा प्रशांत किनारा या प्रांतात आहे.

पुंतारेनास कोस्ता रिकाचा सगळ्यात मोठा प्रांत आहे. याचा विस्तार ११,२६६ किमी असून २०१०मध्ये येथील लोकसंख्या ४,१०,९२९ होती.


अर्थव्यवस्था[संपादन]

मत्सोद्योग आणि पर्यटन हा पुंतारेनासचे मुख्य व्यवसाय आहेत.

प्रशासन[संपादन]

हा प्रांत अकरा कांतोनमध्ये विभागलेला आहे. प्रांताचे प्रशासकीय केंद्र पुंतारेनास येथे आहे.