पी.एच. पांडियन
Appearance
पॉल हेक्टर पांडियन (२७ फेब्रुवारी, १९४५ - ४ जानेवारी, २०२०[१] हे तमिळनाडू राज्यातील राजकारणी होते. ते इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील तिरूनेलवेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते १९७७, १९८०, १९८४ आणि १९८९ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये चेरनमादेवी विधानसभा मतदारसंघातून तामिळनाडू विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी २७ फेब्रुवारी, १९८५ ते ५ फेब्रुवारी, १९८९ या काळात तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम बघितले.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Former Tamil Nadu Assembly Speaker P.H. Pandian no more". 18 जुलै 2023 रोजी पाहिले.