बेनितो मुसोलिनी
Appearance
(बेनिटो मुसोलिनी या पानावरून पुनर्निर्देशित)
बेनितो मुसोलिनी | |
इटलीचा ४० वा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ३१ ऑक्टोबर १९२२ – २५ जुलै १९४३ | |
जन्म | २९ जुलै १८८३ प्रेदाप्पियो, इटली |
---|---|
मृत्यू | २८ एप्रिल १९४५ (वय: ६१) ज्युलिनो दि मेझाग्रा, इटली |
राष्ट्रीयत्व | इटली |
धर्म | रोमन कॅथॉलिक |
बेनितो मुसोलिनी हा इटलीचा माजी पंतप्रधान व हुकुमशहा होता. हुकूमशाह बनण्याआधी तो एक पत्रकार होता. नंतर तो इटालियन राजकारणात आला. इटलीमध्ये फॅसिझम स्थापन करण्यात बेनितो मुसोलिनीने महत्त्वपूर्व भूमिका बजावली. दुसऱ्या महायुद्धामध्ये मुसोलिनीने नाझी जर्मनीसोबत मैत्री केली व अक्ष राष्ट्रांमध्ये सहभाग घेतला.
एप्रिल १९४५ मध्ये अक्ष राष्ट्रांचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुसोलिनीने स्वित्झर्लंडमध्ये पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान त्याला पकडून ठार मारण्यात आले.