Jump to content

टॉय स्टोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टॉय स्टोरी (१९९५)
टॉय स्टोरी (लोगो)
दिग्दर्शन जॉन लॅसेटर
निर्मिती

वॉल्ट डिझनी पिक्चर्स

पिक्सार ऍनिमेशन स्टुडिओ
कथा लॅसेटर, स्टॅन्टन, पीट डॉक्‍टर आणि जो रॅन्फ्ट
पटकथा जॉस व्हेडन, अँड्र्यू स्टॅन्टन, जोएल कोहेन आणि अलेक सोकोलो
प्रमुख कलाकार
  • टॉम हँक्स
  • टिम ऍलन
संगीत रँडी न्यूमन
देश अमेरिका
भाषा इंग्रजी
प्रदर्शित १९ नोव्हेंबर १९९५
वितरक Buena Vista Pictures Distribution
निर्मिती खर्च ३ कोटी डॉलर्स
एकूण उत्पन्न ३७.३ कोटी डॉलर्स



टॉय स्टोरी(१९९५) हा पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओद्वारे निर्मित आणि वॉल्ट डिझनी पिक्चर्सने प्रदर्शित केलेला अमेरिकन संगणक-अ‍ॅनिमेटेड विनोदी चित्रपट आहे. टॉय स्टोरी मालिकेतील पहिला चित्रपट आहे.

हा जगातील पहिला संपूर्ण संगणक-अ‍ॅनिमेटेड फीचर चित्रपट होता. तसेच पिक्सारचा पहिला फीचर चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन लॅसेटर यांनी केले. (त्यांच्या फिचर चित्रपट दिग्दर्शनातील पदार्पण होते.) जॉस व्हेडन, अँड्र्यू स्टॅन्टन, जोएल कोहेन आणि अलेक सोकोलो यांनी पटकथा लिहली. तर कथा लॅसेटर, स्टॅन्टन, पीट डॉक्‍टर आणि जो रॅन्फ्ट यांची होती. या चित्रपटात रॅन्डी न्यूमन यांचे संगीत आहे. बोनी अरनॉल्ड आणि राल्फ गुगेनहेम यांनी निर्मिती केली आणि स्टीव्ह जॉब्स आणि एडविन कॅटमुल यांनी कार्यकारी-निर्मिती केली.

या चित्रपटात टॉम हँक्स, टिम ॲलन, डॉन रिक्ल्स, वॉलेस शॉन, जॉन रॅटझेनबर्गर, जिम वॉर्नी, ॲनी पॉट्स, आर. ली एर्मी, जॉन मॉरिस, लॉरी मेटकाल्फ आणि एरिक वॉन डिटेन यांचे आवाज आहेत.

चित्रपटाचे कथानकात माणसे नसताना खेळणी जिवंत होतात. वुडी नावाचा जुन्या पद्धतीची पुल-स्ट्रिंग काउबॉय बाहुला आणि आधुनिक अंतराळवीर अ‍ॅक्शन फिगर, बझ लाइटइयर यांच्यावर कथा केंद्रित आहे. अँडी डेव्हिस या त्यांच्या मालक असलेल्या मुलाच्या प्रेमासाठी दोघांमध्ये स्पर्धा असते. अँडीपासून वेगळे झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्यासाठी एकत्र काम करतात.

या चित्रपटानी जगभरात ३६१ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी कमाई केली आहे. हा चित्रपट इतका गाजला की त्यानंतर त्याचे आणखी दोन भाग टॉय स्टोरी २ (१९९९) व टॉय स्टोरी ३ (२०१०) मधे प्रदर्शित झाले. ह्या दोन्ही चित्रपटांना देखील प्रचंड यश मिळाले.

पुरस्कार

[संपादन]

चित्रपटाला अनेकांनी आतापर्यंत बनवलेल्या सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपटांपैकी एक मानले आहे. चित्रपटाला तीन ऑस्कर पुरस्कारची नामांकने (सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा (या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला पहिला अ‍ॅनिमेटेड चित्रपट), "यू हॅव गॉट अ फ्रेंड इन मी" साठी सर्वोत्कृष्ट मूळ गाणे आणि सर्वोत्कृष्ट मूळ पार्श्वसंगीत) मिळाली. तसेच ऑस्करचा स्पेशल अचिव्हमेंट पुरस्कार प्राप्त झाला.[] 2005 मध्ये, युनायटेड स्टेट्स लायब्ररी ऑफ काँग्रेसने "सांस्कृतिक, ऐतिहासिक, किंवा सौंदर्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण" म्हणून राष्ट्रीय चित्रपट नोंदणीमध्ये जतन करण्यासाठी चित्रपटाची निवड केली.[] टॉय स्टोरीच्या यशामुळे टॉय स्टोरी 2 पासून सुरू होणारी मल्टीमीडिया फ्रँचायझी आणि तीन सिक्वेलची मालिका सुरू झाली.

चित्रपटाची कमाई

[संपादन]

चित्रपटाने ३७.३ कोटी डॉलर्ससची कमाई केली.[] टॉय स्टोरी हा 1995चा सर्वाधिक कमाई करणारा देशांतर्गत चित्रपट बनला. चित्रपटाने बॅटमॅन फॉरएव्हर, अपोलो 13 (टॉम हँक्स देखील अभिनीत), पोकाहॉन्टास, कॅस्पर, वॉटरवर्ल्ड आणि गोल्डनआय यांना मागे टाकले.[] प्रदर्शनाच्या वेळी, द लायन किंग (1994) आणि अलादीन (1992) नंतर हा तिसरा-सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट होता.[] टॉय स्टोरी हा आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या देशांतर्गत चित्रपटांच्या यादीत ९६ व्या क्रमांकावर आहे.

रिलीजच्या वेळी, अमेरिकेतला 17 व्या-सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला तर जगभरात 21वा-सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून स्थान मिळाले.

चित्रपटाचे यश आणि सन्मान

[संपादन]

1995 मध्ये, टॉय स्टोरीला टाईमच्याच्या "1995च्या सर्वोत्कृष्ट 10 चित्रपटांच्या" यादीत आठवा क्रमांक मिळाला.[] 2011 मध्ये, TIME ने "25 ऑल-टाइम सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फिल्म्स" पैकी एक म्हणून नाव दिले.[] एम्पायर मॅगझिनच्या "सर्वकाळातील 500 सर्वोत्कृष्ट चित्रपटां"च्या यादीत 99 व्या क्रमांकावर आणि "सर्वोच्च रँक असलेला अ‍ॅनिमेटेड चित्रपट" म्हणूनही तो आहे.[]

2003 मध्ये, ऑनलाइन फिल्म क्रिटिक्स सोसायटीने या चित्रपटाला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट म्हणून स्थान दिले.[] 2007 मध्ये, व्हिज्युअल इफेक्ट्स सोसायटीने "सर्वकाळातील टॉप 50 सर्वात प्रभावशाली व्हिज्युअल इफेक्ट्स फिल्म्स"च्या यादीत या चित्रपटाला 22 स्थान दिले. AFIच्या "सर्वकालिक 100 सर्वोत्कृष्ट अमेरिकन चित्रपट"च्या यादीत हा चित्रपट 99 व्या क्रमांकावर आहे.[१०] त्या यादीतील फक्त दोन अ‍ॅनिमेटेड चित्रपटांपैकी हा एक होता, दुसरा स्नो व्हाइट आणि सेव्हन ड्वार्फ्स (1937) होता. AFIच्या 10 टॉप 10 मधील अ‍ॅनिमेशन प्रकारातील ते सहाव्या क्रमांकावर होते.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "How 'Toy Story' changed the face of animation, taking off 'like an explosion'". Los Angeles Times (इंग्रजी भाषेत). 2015-09-30. 2021-12-31 रोजी पाहिले.
  2. ^ "Librarian of Congress Adds 25 Films to National Film Registry". Library of Congress, Washington, D.C. 20540 USA. 2021-12-31 रोजी पाहिले.
  3. ^ "Toy Story". Box Office Mojo. 2021-12-31 रोजी पाहिले.
  4. ^ "Domestic Box Office For 1995". Box Office Mojo. 2021-12-31 रोजी पाहिले.
  5. ^ "BW Online | November 23, 1998 | STEVE JOBS, MOVIE MOGUL". web.archive.org. 2011-06-13. रोजी मूळ पानापासून संग्रहित2011-06-13. 2021-12-31 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  6. ^ "The Best Of 1995: CINEMA - TIME". archive.ph. 2012-12-08. 2021-12-31 रोजी पाहिले.
  7. ^ "Ar". रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-09-13. 2021-12-31 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  8. ^ "Em".
  9. ^ Ball, Ryan (2003-03-04). "Toy Story Tops Online Film Critics' Top 100". Animation Magazine (इंग्रजी भाषेत). 2021-12-31 रोजी पाहिले.
  10. ^ "Afi" (PDF).