पाली (रायगड)
Appearance
(पाली, रायगड, महाराष्ट्र (गांव) या पानावरून पुनर्निर्देशित)
पाली भाषा याच्याशी गल्लत करू नका.
?पाली महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | रायगड |
लोकसंख्या | ८,१६७ (२००१) |
पाली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. सरसगडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे.
इतिहास
[संपादन]शिवाजी महाराज यांनी १६५७ साली कोकणात उतरून सरसगड, सागरगड, सुधागड किल्ले जिंकले असा इतिहास आहे. जवळच्या पाच्छापूर गावी संभाजी राजे आणि औरंगझेबाचा मुलगा अकबर यांची ऐतिहासिक भेट झाली होती. [१]
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]पाली-खोपोली रस्त्यावर शेमडी नजिक उंबरखिंड, जांभुळपाडय़ातील गणपती, कोंडगावचे धरण, नागशेत येथे खडसंबाळे लेणी, भेलीव येथील मृगगड, राजणकुंडजवळील कोंडजाईदेवी, वरदायनीदेवी, सिद्धेश्वर रस्त्यावरील एकवीस गणपती मंदिर, उन्हेऱ्याची व उद्धरची गरम पाण्याची कुंडे अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
संदर्भ व टीप
[संपादन]- ^ "ऐतिहासिक सुधागड-पाली". 2018-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-12 रोजी पाहिले.