पायथॉन (आज्ञावली भाषा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पायथन ही एक उच्चस्तरीय[१] भाषा आहे. १९९१मध्ये ती प्रथम प्रकाशित झाली.

पायथनची सध्याची आवृत्ती ३.६.३ आहे. पायथन २.७ आणि ३ मध्ये बराच मोठा बदल झाला.

वैशिष्ट्ये[संपादन]

 • पायथन ही एक बहुभिमुख आज्ञावली भाषा आहे. म्हणजे ती वस्तुभिमुख[१], कार्यनिष्ठ, अशा कोणत्याही प्रकारे वापरता येते.
 • या भाषेचा विकास करताना ती अधिकाधिक नैसर्गिक वाटेल यादृष्टीने व्याकरण बनवले आहे.
 • तसेच, आज्ञावली अधिकाधिक वाचनीय होईल यादृष्टीने भाषेचे व्याकरण बनवले आहे. उदा., यात आज्ञाखंड (blocks of code) गुंफताना कंस वापरण्याऐवजी समास सोडला जातो.
 • ही एक विवृत भाषा आहे.[१]
 • डायनॅमिक चलप्रकार व्यवस्था वापरली जाते.[१]
 • स्वयंचलित स्मृती व्यवस्थापन असते.
 • यात युनिकोड चलनामे वापरता येतात.[२]
 • पायथन मुक्त स्रोत आहे. [३]

उदाहरण[संपादन]

उत्तर = input("पायथन सोपी आहे का? ")
if उत्तर == "हो":
    print("छान")


उदाहरण[संपादन]

a=b=c=1 a,b,c = 1,2,"john"

संदर्भ[संपादन]

 1. १.० १.१ १.२ १.३ कार्यकारी सारांश
 2. डिफॉल्ट एनकोडींग यूटीएफ-८
 3. पायथनचा मुक्तस्रोत परवाना

बाह्य दुवे[संपादन]

 1. पायथॉनचे अधिकृत संकेतस्थळ
 2. पायथनचे अधिकृत दस्तावेजीकरण


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.