पादांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पादांग
Padang
प्रांतीय राजधानी, शहर

(वरपासून डावीकडून उजवीकडे या क्रमाने): रुमा गादांग अर्थात मिनांकाबाऊ लोकांचे पारंपरिक घर, पादांगाची महान मशीद, जुन्या पादांग शहराचा भाग, सिकुआई बेट, आंदालास विद्यापीठ, लुबुआक तांपुरुआंग धबधबा, पादांगाची आकाशरेखा
Logo Padang.svg
चिन्ह
Lokasi Sumatera Barat Kota Padang.svg
पादांगचे इंडोनेशियामधील स्थान
पादांग is located in इंडोनेशिया
पादांग
पादांग
पादांगचे इंडोनेशियामधील स्थान

गुणक: 0°57′0″S 100°21′11″E / 0.95°S 100.35306°E / -0.95; 100.35306गुणक: 0°57′0″S 100°21′11″E / 0.95°S 100.35306°E / -0.95; 100.35306

देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
प्रांत पश्चिम सुमात्रा
स्थापना वर्ष ७ ऑगस्ट, इ.स. १६६९
क्षेत्रफळ ६९४.९६ चौ. किमी (२६८.३३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर ९,३३,५८४
  - घनता १,३०० /चौ. किमी (३,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ इंडोनेशिया पश्चिम वेळ (यूटीसी +७)
http://www.padang.go.id/


पादांग (बहासा इंडोनेशिया: Padang) हे इंडोनेशियाच्या पश्चिम सुमात्रा प्रांताचे राजधानीचे, तसेच प्रांतातील सर्वांत मोठे शहर आहे. सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे शहर विस्ताराने ६९४.९६ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचे असून इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार ९,३३,५८४ एवढ्या लोकसंख्येचे आहे.

संस्कृती[संपादन]

पादांग खाद्यसंस्कृती[संपादन]

मिनांकाबाऊ लोकांचे वैशिष्ट्य मानले जाणारे अन्न "पादांग अन्न" असे या शहराच्या नावाने ओळखले जाते. मसालेदार आणि रुचकर अन्नपदार्थांमुळे पादांग रेस्टॉरंटे इंडोनेशियात व अन्य देशांमध्येही लोकप्रिय आहेत. अशा रेस्टॉरंटांत पादांग जेवण दिवसभरासाठी एकदाच बनवले जाते व आपापल्या पसंतीनुरूप पदार्थ वाढून घेण्यासाठी गिऱ्हाइकांसमोर खुले मांडून ठेवले असते. गिऱ्हाइके आपल्याला हवे ते व हवे तेवढे पदार्थ ताटात वाढून घेऊन त्यानुसार पैसे देतात. सहसा भातासोबत मासे, भाज्या, गायीच्या, बोकडाच्या, तसेच कोंबडीच्या मांसापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे छोटे छोटे वाटे ताटात वाढून घेण्याची या जेवणात रीत असते. मसाल्यासोबत मांस रटरटून शिजवलेले "रंदांग" नावाचे कालवण, गोमांसाचे गोळे सोडून बनवलेले "सोतो पादांग" नावाचे सूप, तसेच साते इत्यादी पादांग खाद्यपदार्थ खूप लोकप्रिय आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेतWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.