बापू गोखले
Jump to navigation
Jump to search
नरहर गणेश तथा बापू गोखले (इ.स. १७७७ - १९ फेब्रुवारी, १८१८) हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शूर व विश्वासू सरदार आणि मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती होते.
गोखले यांचे मूळ गाव कोकणातले तळेखाजण असून नंतर ते विजयदुर्ग तालुक्यातील पिरंदवणे येथे राहू लागले.
निमगाव म्हाळुंगी येथॆे गोखले यांचा वाडा आहे.
गोखले यांनी महाबळेश्वर येथील पाच नद्यांच्या उगमाजवळच्या महाबळेश्वराच्या (शंकराच्या) देवळात देवाजवळली अहोरात्र नंदादीपांपैकी एक लावलेला आहे. त्याची खर्चीची रक्कम इंग्रज सरकारचे खजिन्यांतून मिळते.[ संदर्भ हवा ]
बापू गोखले यांच्यावरील मराठी पुस्तके[संपादन]
- बापू गोखले यांचे चरित्र (शंकर तुकाराम शालिग्राम). हे पुस्तक येथे मोफत वाचता येते.
- सरदार बापू गोखले (सदाशिव आठवले)