परशुरामभाऊ पटवर्धन
परशुरामभाऊ पटवर्धन (१७४०-१७९९) हे जमखंडी संस्थानचे संस्थानिक होते. हे पेशव्यांच्या काळातील सरदार पटवर्धनांचे चिरंजीव असून ते दानशूर होते.
कारकीर्द
[संपादन]हरभटांची सहा मुले पेशव्यांच्या सेवेत रुजू झाली पण त्यातल्या तिघांचीच कारकीर्द नेत्रदिपक होती: विशेषकरून गोविंदराव आणि रामचंद्रराव. रामचंद्र पटवर्धन उत्तरेकडील मोहीमेत निधन पावले त्यावेळी परशुरामचे वय अवघे ९ वर्षे होते. पण लहानपणापासूनच ते शस्त्र आणि शास्त्रविद्येत निष्णात होते. १७७५ ते १७९९ हया काळात पेशव्यांचे प्रतिनिधी आणि नंतर सेनापती म्हणून १०० मोहिमांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. विशेषकरून इंग्रज-म्हैसूर युद्धांमध्ये ते मराठ्यांच्या बाजूने इंग्रजांसमवेत हैदर अली आणि टिपू सुलतानाविरुद्ध लढले. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पेशव्यांकडून प्रथम तासगाव आणि नंतर जमखंडीची जहागिर मिळाली. जमखंडीच्या जहागिरीचे रूपांतर पुढे संस्थानात झाले. ब्रिटिश सेनानी आर्थर वेलस्ली ह्याने परशुराम भाऊंविषयी 'सर्वात विश्वासू मराठा सरदार' असे कौतुकोद्गार काढले आहेत.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव". पुढारी. 2020-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-08 रोजी पाहिले.