पंडित विद्यासागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रा. डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे कुलगुरु आहेत. त्यांनी जैवभौतिकशास्त्र आणि वैद्यकीय भौतिकशास्त्र या विषयांवर संशोधनकेले आहे. विद्यासागर हे मराठीत विज्ञानसाहित्यही लिहितात. सुपरक्लोन आणि आंतराळी या त्यांच्या विज्ञान काल्पनिका प्रसिद्ध आहेत. ओवी गाऊ विज्ञानाची या त्यांच्या ग्रंथास अनेक पुरस्कार मिळाले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांनी कुलगुरु पदावर असताना एक शिक्षक एक कौशल्य आणि श्वास या योजना सुरू केल्या. श्वास या योजनेद्वारे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात येते.

ते भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, मराठी विज्ञान परिषद, तसेच लोकविज्ञान संघटना या संस्थांनी आयोजित केलेल्या कामांमध्ये सहभाग घेतात.