पुंता गोर्दा, बेलीझ
Appearance
(पंटा गोर्डा, बेलीझ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख बेलीझमधील शहर पुंता गोर्दा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पुंता गोर्दा (निःसंदिग्धीकरण).
पुंता गोर्दा बेलीझमधील एक शहर आहे. टोलेडो जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. याला स्थानिक लोक पीजी म्हणून ओळखतात तर गारिफुना भाषेत या शहरास पैनी असे नाव आहे.
२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५,९१० होती. पुंता गोर्दा विमानतळापासून माया आयलंड एर आणि ट्रॉपिक एर या विमानकंपन्या बेलीझ सिटी, प्लॅसेन्सियास आणि डांग्रिगाला सेवा पुरवतात.