टोलेडो जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टोलेडो जिल्हा बेलीझ देशातील सहापैकी एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पुंता गोर्दा येथे आहे.

देशाच्या दक्षिण टोकास कॅरिबियन समुद्रावर असलेला हा जिल्हा शेतीप्रधान असून येथे कडधान्ये व मक्याची शेती होते.

२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,५३८ होती. बेलीझच्या प्रतिनिधीगृहातील ३१ पैकी दोन मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत.