पंचबळी
Appearance
क्रिकेटमध्ये, जेव्हा गोलंदाज एकाच डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतो तेव्हा पाच बळी मिळवणे म्हणजेच पंचबळी फाइव विकेट हॉल, फाइव-फॉर किंवा फाइफर होय.
पंचबळी म्हणजे फलंदाजाने धावांचे शतक केल्यासमान आहे.
गोलंदाजासाठी, विशेषतः कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत ही एक उल्लेखनीय कामगिरी मानली जाते. टी२० सामन्यांमध्ये हे क्वचितच बघायला मिळते.
लॉर्ड्सवर पाच विकेट्स घेतल्याने गोलंदाजाला लॉर्ड्सच्या सन्मान मंडळात स्थान मिळते.