न्यूझ नेशन
Appearance
न्यूझ नेशन ही एक भारतीय वृत्तवाहिनी आहे. ते मोफत प्रसारित होणारे हिंदी दूरदर्शन चॅनेल आहे. न्यूझ नेशनची मालकी न्यूझ नेशन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे.[१]
न्यूझ नेशनचे चाचणी सिग्नल ऑक्टोबर २०१२ मध्ये सुरू झाले आणि १४ फेब्रुवारी २०१३ पासून प्रसारित झाले. यात राजकारण, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, क्रिकेट आणि बॉलीवूड यांसारख्या क्षेत्रातील समस्यांवर बातम्या दिल्या जातात. चॅनेलने १९ फेब्रुवारी २०१४ रोजी "न्यूझ नेशन उत्तर प्रदेश - उत्तराखंड" हे पहिले प्रादेशिक वृत्त चॅनल सुरू केले. ते DD Freedish, DEN आणि Dish TV प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. चॅनेलचे नाव "न्यूझ स्टेट उत्तर प्रदेश - उत्तराखंड" असे केले गेले.
संदर्भ
[संपादन]- ^ "News Nation UP/Uttarakhand News TVC added on DD-Freedish & Dish TV" (इंग्रजी भाषेत). 2022-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-13 रोजी पाहिले.