नेस्ले
शेअर बाजारातील नाव | NESN |
---|---|
महत्त्वाच्या व्यक्ती |
पॉल बकी[१] (Chairman) Ulf Mark Schneider[१] (CEO) David McDaniel[२] (CFO) |
उत्पादने | बाळांचे अन्न (बेबी फूड), कॉफी, डेअरी उत्पादने, breakfast cereals, confectionery, बाटलीबंद पाणी , आईस्क्रीम, पाळीव प्राणी खाद्य |
एकूण इक्विटी | ▲ CHF53.73 billion (2021)[३] |
संकेतस्थळ |
nestle |
नेस्ले SA [a] ( इंग्रजी: Nestlé S.A. फ्रेंच: [nɛsle]; जर्मन: [ˈnɛstlə] [४]) ही एक स्विस बहुराष्ट्रीय खाद्य आणि पेय प्रक्रिया कंपनी आहे. तिचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील वेवे, वौड येथे आहे.
२०१४ पासून महसूल आणि इतर निकषांद्वारे मोजली जाणारी ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक खाद्य कंपनी आहे. [५] [६] [७] [८] [९] २०१७ मध्ये फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीत ही ६४ व्या स्थानावर होती. [१०] फोर्ब्स ग्लोबल २००० च्या सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या २०१६ च्या यादीनुसार ही कंपनी ३३ व्या क्रमांकावर आहे. [११]
नेस्लेच्या उत्पादनांमध्ये बालकांचे अन्न ( बेबी फूड; काही ठिकाणी मानवी दूध ऑलिगोसॅकराइड्ससह ), वैद्यकीय अन्न, बाटलीबंद पाणी, नाश्ता तृणधान्ये, कॉफी आणि चहा, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम, गोठलेले अन्न, पाळीव प्राणी आणि स्नॅक्स यांचा समावेश आहे. नेस्लेच्या २९ ब्रँडची वार्षिक विक्री १ अब्ज CHF (सुमारे US$१.१ billion )पेक्षा जास्त आहे. [१२] यामध्ये नेस्प्रेसो, नेस्काफे, किट कॅट, स्मार्टीज, नेस्क्विक, स्टॉफर्स, विटेल आणि मॅगी यांचा समावेश आहे. नेस्लेचे ४४७ कारखाने आहेत, ते १८९ देशांमध्ये कार्यरत आहेत आणि सुमारे ३,३९,००० लोकांना रोजगार देतात. [१३] ही जगातील सर्वात मोठी सौंदर्यप्रसाधने कंपनी लॉरियल (इंग्रजी: L'Oreal) च्या मुख्य भागधारकांपैकी एक आहे. [१४]
जॉर्ज आणि चार्ल्स पेज बंधूंनी १८६६ मध्ये स्थापन केलेली "अँग्लो-स्विस मिल्क कंपनी" आणि हेन्री नेस्ले यांनी १८६७ मध्ये स्थापन केलेली "फॅरीन लॅक्टी हेन्री नेस्ले" यांच्या विलीनीकरणाद्वारे नेस्ले कंपनी १९०५ मध्ये स्थापन करण्यात आली. [१५] पहिल्या महायुद्धादरम्यान आणि दुसर्या महायुद्धानंतर कंपनीची लक्षणीय वाढ झाली, तिने सुरुवातीच्या कंडेन्स्ड मिल्क आणि इन्फंट फॉर्म्युला उत्पादनांच्या पलीकडे आपल्या उत्पादनांचा विस्तार केला. कंपनीने १९५० मध्ये Crosse & Blackwell, १९६३ मध्ये Findus, 1971 मध्ये Libby's, १९८८ मध्ये Rowntree Mackintosh, १९९८ मध्ये Klim आणि २००७ मध्ये Gerber यासह अनेक कॉर्पोरेट अधिग्रहणे केली आहेत.
ही कंपनी विविध विवादांशी संबंधित आहे. विकसनशील देशांमध्ये (जेथे स्वच्छ पाण्याची कमतरता असू शकते, तेथे) स्तनपानाला पर्याय म्हणून बेबी फॉर्म्युलाची मार्केटिंग, कोको उत्पादनात बालमजुरीवर अवलंबून राहणे, तसेच बाटलीबंद पाण्याचे उत्पादन आणि प्रोत्साहन यांसारख्या अनेक ठिकाणी कंपनीला टीका आणि बहिष्काराचा सामना करावा लागला आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Management". Nestlé. 1 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "Mr. David McDaniel" (PDF). nestle.in. 14 September 2021 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;AR2021
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ Empty citation (सहाय्य)
- ^ "Nestlé's Brabeck: We have a "huge advantage" over big pharma in creating medical foods" Archived 2014-04-10 at the Wayback Machine., CNN Money, 1 April 2011
- ^ "Nestlé: The unrepentant chocolatier" Archived 2012-04-06 at the Wayback Machine., The Economist, 29 October 2009. Retrieved 17 May 2012
- ^ Rowan, Claire (9 September 2015). "The world's top 100 food & beverage companies – 2015: Change is the new normal". Food Engineering. 14 November 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 November 2016 रोजी पाहिले.
- ^ McGrath, Maggie (27 May 2016). "The World's Largest Food And Beverage Companies 2016: Chocolate, Beer And Soda Lead The List". Forbes. 15 November 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 November 2016 रोजी पाहिले.
- ^ "Nestlé tops list of largest food companies in the world". Forbes. 26 October 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 October 2017 रोजी पाहिले.
- ^ "Fortune Global 500 List 2017: See Who Made It". Fortune (इंग्रजी भाषेत). 30 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 January 2018 रोजी पाहिले.
- ^ "The World's Biggest Public Companies". Forbes. 10 April 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 November 2016 रोजी पाहिले.
- ^ "Nestlé: Tailoring products to local niches" Archived 2011-12-09 at the Wayback Machine. CNN, 2 July 2010.
- ^ "Annual Results 2014" (PDF). Nestlé. 25 March 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 25 March 2015 रोजी पाहिले.
- ^ "Nestlé to Decide on L’Oreal in 2014, Chairman Brabeck Says" Archived 2014-07-08 at the Wayback Machine.. Bloomberg, 14 April 2011
- ^ "The History of Nestlé". Cleverism (इंग्रजी भाषेत). 3 September 2015. 25 May 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 May 2018 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.