नेटाक्षरी
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
प्रस्तावना
[संपादन]ई-पत्रा द्वारे वितरीत होणारे मराठी कवितांचे एकमेव साप्ताहिक आहे नेटाक्षरी.
नवीन उभरत्या मराठी कविंच्या दर्जेदार कवितांना व्यासपीठ देण्याचा तसेच नियमीत नव्या कवितांच्या कल्पनांच्या शोधात असणाऱ्या रसिकांना नजराणा देण्याचा हा एक प्रयोग
अंकाची साधारण रूपरेषा अशी आहे. काव्यांजली आणि मराठी कविता कम्म्युनिटीवर प्रसिद्ध झालेल्या निवडक १० कविता आणि एखादा लेख घेऊन अंक बनेल. सहा संपादकांचं मंडळ असेल. दरवेळी मुख्य संपादक बदलेल. तसेच दरवेळी एक पाहुणा संपादक असेल. हे सगळे मिळून कविता निवडतील. अंक बनवणे , ले आउट आदी काम यजमान संपादक करेल.अंक दर सोमवारी निघेल.
यजमान संपादक मंडळ
[संपादन]- नाम गुम जायेगा , ठाणे
- सोनाली घाटपांडे , पुणे
- सुरूचि नाईक , नागपूर
- रेणूका रेपाळ , अमेरिका
- सचिन काकडे , मुंबई
- आनंद माने ,सोलापूर
- अहं ब्रह्मास्मि , पुणे
- स्वप्ना कोल्हे , नाशिक
- सारंग भणगे , पुणे
विचार
[संपादन]सुरुवातीला सुमारे दहा हजार वाचकांपर्यंत जाणारा अंक लवकरच एक लाख वाचकांपर्यंत नेण्याचा मनसुबा आहे. हा भला मोठा जगन्नाथाचा रथ आहे. एकीकडे नवोदित कविंना एक भलंमोठं व्यासपीठ मिळवून द्यायचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे मराठी अभिरुचीला साजेल असं साहित्य स्वस्तात ( विनामूल्यच) पुरवण्याचा एक प्रयत्न आहे . एक लाख लोकांकडे पोहोचल्यावर या अंकाला पाय फ़ुटतील आणि तो नेटवरील प्रत्येक मराठी माणसाच्या मेलबॉक्स पर्यंत पोहोचेल.मराठी भाषेतला हा एकमेवाद्वितीय प्रयोग सर्वजण मिळून यशस्वी करतात. ईमेल पत्ता - netaksharee@gmail.com