नील पॅट्रिक हॅरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नील पॅट्रिक हॅरिस (१५ जून, १९७३:आल्बुकर्की, न्यू मेक्सिको, अमेरिका - ) हा अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे. याने डूगी हाउझर, एम.डी., हाउ आय मेट युअर मदर सह अनेक दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनय केला.

हॅरिसला एक टोनी पुरस्कार तसेच पाच प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाले आहेत.