Jump to content

नील कस्तुरिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नील कस्तुरिका
नील कस्तुरिका

नील कस्तुरिका किंवा गोलफा (इंग्लिश:Indian Blue Rock Thrush;हिंदी:कश्मिरी कस्तूरी, श्यामा) हा एक आकाराने बुलबुलापेक्षा मोठा पक्षी आहे.

नराचा रंग निळा व मादीचा वरील रंग राखी-पिंगट असतो. खालील भाग पंढूरका. त्यावर गर्द तपकिरी रंगाच्या रेषा व पंखांवर पिवळट रेषा असतात.

वितरण

[संपादन]

ते भारत, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंकाब्रह्मदेश या ठिकाणी राहतात.

निवासस्थाने

[संपादन]

ते पाषाणयुक्त क्षेत्र, सागर किनाऱ्यावरील खडक, खाणी, विटांच्या भट्ट्या तसेच पुरातन गड व इमारती या ठिकाणी राहतात.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली