Jump to content

नीलम चक्रीवादळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नीलम चक्रीवादळाचे मोदीस उपग्रहाने घेतलेले छायाचित्र
नीलम चक्रीवादळाचा मार्ग

नीलम चक्रीवादळ (इंग्लिश: Cyclone Nilam, सायक्लोन नीलम ; भाहवि नामकरण: BOB 02, बीओबी ०२ ; संटाइकें नामकरण: 02B, ०२बी) हे हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरात इ.स. २०१२ साली तयार झालेले एक चक्रीवादळ आहे. हे वादळ कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात २८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी चेन्नईपासून ५५० कि.मी. नैऋत्येला तयार होऊन ते भारतीय किनारपट्टीकडे सरकत आहे. नीलम चक्रीवादळ बुधवारी संध्याकाळपर्यंत तामिळनाडूच्या कुब्बालोर आणि आंध्र प्रदेशच्या नेल्लोरदरम्यान किनारपट्टीवर येऊन धडकण्याची शक्यता आहे.

वादळांना नाव देण्याच्या प्रक्रियेअंतर्गत पाकिस्तानने सुचविल्यानुसार या वादळाचे नामकरण "नीलम' असे करण्यात आले आहे.

या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर चेन्नईत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. चेन्नई तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आली.