निषिद्ध आचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे एक लोकाचाराचे स्वरूप आहे. प्रत्येक धर्मात माणसाने कोणती कृत्ये करू नयेत याचीही बंधने घालून दिलेली असतात.त्या बंधनांना निषिद्ध आचार असे म्हटले जाते. हिंदू धर्मात गोमांस भक्षण, एकादशीच्या दिवशी भोजन करणे , महिलांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेणे , चातुर्मासात कांदे किंवा वांगे खाणे, श्रावण महिन्यात मांस खाणे किंवा मद्यपान करणे,इत्यादींचा निषेध व्यक्त केला आहे.सध्याच्या विज्ञान युगात निषिद्ध आचारांची पकड बरीच सैल झाल्यासारखी दिसत आहे.