निशा शिवूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अॅड. निशा शिवूरकर ह्या महाराष्ट्रातील एक जेष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील परित्यक्त्या स्त्रियांचा प्रश्न धसास लावले आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यास प्रारंभ करून समाजवादी चळवळीत गेली ४० वर्ष कार्यरत आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी झालेल्या चळवळीत कृती समितीच्या उपाध्यक्ष या नात्याने योगदान दिले आहे.[१][२][३][४][५]

लेखन[संपादन]

"लढा 'टाकलेल्या' स्त्रियांचा" हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले.[६][७] अनेक पुस्तकांमध्ये त्यांच्या लेखांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांत तसेच मिळून सा-याजणी, मुक्त शब्द, आंदोलन मासिकांतूनही त्यांनी विविध विषयावर विपुल लेखन केले आहे. लोकसत्ता मध्ये सन २००६ मध्ये कवडसे सदरात लेखन केले. तसेच पुण्यनगरी दैनिकात ‘अर्धे आकाश’ या सदरातून लेखन करीत आहेत.[८][१][२][४][९]

पुरस्कार व सन्मान[संपादन]

 • महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार (२०१८)[१०]
 • मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (२०१८)[१][२][११]
 • "लढा टाकलेल्या स्त्रियांचा" ह्या त्यांच्या पुस्तकास केसरी मराठा संस्थेचा न.ची. केळकर पुरस्कार दिला गेला आहे.
 • येळ्ळूर ग्रामीण साहित्य संघ बेळगावचा रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
 • छात्रभारतीचा डॉक्टर अरुण लिमये युवा जागर पुरस्कार
 • डॉक्टर अनिता अवचट पुरस्कार
 • नवनीत शहा आदी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहे.

संदर्भ[संपादन]

 1. ^ a b c "ॲड निशा शिवूरकर यांना २१वा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार |". Archived from the original on 2020-02-23. 2020-12-02 रोजी पाहिले.
 2. ^ a b c "निशा शिवूरकर". Maharashtra Times. 12 जाने, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ "निशा शिवूरकर". Maharashtra Times. 2020-12-02 रोजी पाहिले.
 4. ^ a b "निशा शिवूरकर". Loksatta. 2019-01-08. 2020-12-02 रोजी पाहिले.
 5. ^ author/lokmat-news-network (2019-01-22). "Namantar Andolan : 'नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन' : निशा शिवूरकर". Lokmat. 2020-12-02 रोजी पाहिले.
 6. ^ "परित्यक्ता स्त्रीसंघर्षाचा दस्तावेज". www.saptahiksakal.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-01-19. 2020-12-02 रोजी पाहिले.
 7. ^ "Marathi Books by निशा शिवूरकर nishA shivUrakar". www.rasik.com. Archived from the original on 2022-09-27. 2020-12-02 रोजी पाहिले.
 8. ^ "वेदनेचा दाहक सांगावा (ॲड. निशा शिवूरकर) | eSakal". www.esakal.com. 2020-12-02 रोजी पाहिले.
 9. ^ "साधना". www.weeklysadhana.in. 2020-12-02 रोजी पाहिले.
 10. ^ "अ‍ॅड.निशा शिवूरकर, २०१८". Maharashtra Foundation Awards (इंग्रजी भाषेत). 2020-12-02 रोजी पाहिले.
 11. ^ "डॉ. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांवर प्रचंड ऋण ; भीमाबाई पुरस्कार स्त्रियांच्या चळवळीचा गौरव : ॲड. निशा शिवूरकर | Satara Today". http://www.sataratoday.com/ (इंग्रजी भाषेत). 2020-12-02 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)