निर्मला सीतारामन्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
निर्मला सीतारामन्

निर्मला सीतारामन् (जन्म: १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) या भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत.

निर्मला सीतारामन् यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला.. ३ सप्टेंबर २०१७ पासून ते ३० मे २०१९ त्या भारताच्या संरक्षणमंत्री व ३० मे २०१९ ते आतापर्यंत भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले.[१] त्यापूर्वी सीतारामन् यांनी अर्थ राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्या आधी, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.[२]

कर्नाटकातून त्या राज्यसभेच्या सदस्या म्हणून निवडल्या गेल्या.[३][४]


वैयक्तिक जीवन[संपादन]

तमिळनाडूतील मदुराई इथे निर्मला सीतारामन् यांचा जन्म नारायणन् सीतारामन् आणि सावित्री या दांपत्त्याच्या पोटी झाला. नारायणन् हे रेल्वेत नोकरीला होते. त्यामुळे निर्मला यांचे बालपण वेगवेगळ्या शहरांत गेले. त्यांचे शालेय शिक्षण मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथे झाले. तिरुचिरापल्ली येतील सीतालक्ष्मी रामस्वामी महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर पदवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून प्राप्त केली.[५]

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांची पहिली भेट त्यांचे पती परकाला प्रभाकर यांच्याशी झाली.[६]

संदर्भ[संपादन]