निर्गुडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निर्गुंडी या पानावरून पुनर्निर्देशित)

निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्यी निरगुडीचा समावेश होतो; स्नायु विश्रांतिसाठी, दुखणे व जळजळ कमी करण्यासाठी, संधिवात, त्वचा रोग, डोकेदुखी, इत्यादी. आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या रोगांसाठी निरगुडी शिलाजिताबरोबर देल्यास चालते.

वनस्पती[संपादन]

निरगुडी वाढणारी ही बहुवर्षायू व एकदलीय वनस्पती २ ते ५ मी. बुंध्याचा व्यास ५-२० सेमी असतो.

उंच व झुबक्यांनी वाढते. खोड ( मूलस्तंभ ) आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो. मुळे आखूड, तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात. पाने (पाती) १-१.५ मी. लांब, टोकाला निमुळती होत गेलेली आणि हिरवी असतात. निरगुडीच्या वरच्या भागात पांढरी फुले असतात.[१]

लागवड[संपादन]

निरगुडीची लागवड घराच्या परस बागेमध्ये कुंपणाच्या साहाय्याने केली जाते.

उपयोग[संपादन]

  • निरगुडीचा पाला गरम करून सुजेवर बांधले जाते. निरगुडीच्या गरम पाल्याने सूज आणि ठणका दोन्ही थांबते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ महाजन, श्रीधर दत्तात्रय. देशी वृक्ष, पा.क्र. १२३.