निर्गुडी
निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्यी निरगुडीचा समावेश होतो; स्नायु विश्रांतिसाठी, दुखणे व जळजळ कमी करण्यासाठी, संधिवात, त्वचा रोग, डोकेदुखी, इत्यादी. आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या रोगांसाठी निरगुडी शिलाजिताबरोबर देल्यास चालते.
वनस्पती
[संपादन]निरगुडी ही बहुवर्षायू वाढणारी व एकदलीय वनस्पती आहे. उंची २ ते ५ मी तर बुंध्याचा व्यास ५-२० सेमी असतो. उंच व झुबक्यांनी वाढते. खोड (मूलस्तंभ) आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो. मुळे आखूड, तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात. पाने (पाती) १-१.५ मी. लांब, टोकाला निमुळती होत गेलेली आणि हिरवी असतात. निरगुडीच्या वरच्या भागात पांढरी फुले असतात.[१]
लागवड
[संपादन]निरगुडीची लागवड घराच्या परस बागेमध्ये कुंपणाच्या साहाय्याने केली जाते.
उपयोग
[संपादन]- निरगुडीचा पाला गरम करून सुजेवर बांधले जाते. निरगुडीच्या गरम पाल्याने सूज आणि ठणका दोन्ही थांबते.
संदर्भ
[संपादन]- ^ महाजन, श्रीधर दत्तात्रय. देशी वृक्ष, पा.क्र. १२३.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |