निमरूद
Appearance
निमरूद |
---|
निमरूद हे सध्या इराकमध्ये असलेले असीरियन संस्कृतीचे एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. मोसुल शहरापासून हे ठिकाण ३० किलोमीटरवर तिग्रीस नदीच्या तीरावर आहे. बायबलमध्ये निमरूदचा उल्लेख कलाह असा केलेला आहे.
इतिहास
[संपादन]८९० एकराचा परिसर व्यापलेल्या या नगरीची स्थापना शलमानेसेर या असिरियन राजाने इ.स.पूर्व तेराव्या शतकात केली.[१] अशुरबानीपाल दुसरा याने इ.स.पूर्व नवव्या शतकात या नगरीचे पुनरुज्जीवन केले. या नगरीत अनेक प्रासाद व मंदिरे होती. नगरीभोवती तटबंदी बांधलेली होती. प्रासादांच्या अवशेषात प्रचंड आकाराची पंखयुक्त दगडी बैलांची शिल्पे आहेत.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ मार्क वान डी मयरुप. "द एन्शन्ट मेसोपोटेमियन सिटी" (इंग्रजी भाषेत). २९ जून, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)