निनेवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निनेवे
निनेवे is located in इराक
निनेवे
निनेवे
निनेवेचे इराकमधील स्थान
गुणक: 36°21′34″N 43°09′10″E / 36.35944°N 43.15278°E / 36.35944; 43.15278

निनेवे हे उत्तर इराकमध्ये मोसुल शहराजवळ तिग्रीस नदीच्या तीरावर असलेले एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. या स्थळाचा शोध रीच या पुरातत्त्ववेत्त्याने इ.स. १८२० साली लावला. पॉल एमिल बोट्टा या पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या स्थळाचे इ.स. १८४२ साली उत्खनन केले. हे ठिकाण नव असिरीयन साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. हे शहर प्राचीन काळातील एक सर्वात मोठे शहर म्हणून गणले जात होते.[१]

उत्खनन[संपादन]

निनेवे येथे केल्या गेलेल्या उत्खननात असिरियन राजे यसेन्नचेरिब व अशुरबानीपाल यांच्या राजवाड्याचे अवशेष सापडले. इ.स.पूर्व पहिल्या सहस्त्रकात असुर आणि निमरूद यांच्या बरोबरीने निनेवे राजधानीचे शहर बनले. या काळातील प्रचंड प्रासादांचे अवशेष, कलापूर्ण वास्तु-शिल्पे, उठावातील शिल्पे आणि क्यूनिफॉर्म लिपीतील अनेक लेख येथील उत्खननातून मिळाले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. मॅट टी. रोसेनबर्ग. लार्जेस्ट सिटिज थ्रू हिस्ट्री. जिओग्राफी.अबाऊट.कॉम. २९ जून, इ.स. २०१३ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)