ना.भा. खरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


डाॅ. नारायण भास्कर खरे (जन्म : नेर-रायगड जिल्हा, १६ मार्च १८८४; - इ.स. १९७०) हे एक हिंदुस्थानी राजकारणी व व्यवसायाने डाॅक्टर होते. त्यांचे वडील भिवंडीला सरकारी वकील होते. आई, दुर्गाबाई ही, मराठ्यांचा शेवटचा सेनापती बापू गोखले याच्या वंशातली होती. ना.भा. खरे हे मध्य प्रांतांतील काँग्रेसचे नेते, हरिजनांसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि लेखक होते. महात्मा घांधींंबरोबर ते हरिजन वस्त्यांमधून फिरत असत. पण जेव्हा मध्य प्रांतात 'हरिजन मंत्री' नेमण्याची वेळ आली तेव्हा गांधीजींनी खऱ्यांना नाकारले.

ना.भा. खरे हे नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या 'तरुण भारत'चे संस्थापक होते.

विदर्भ प्रांतिक काँग्रेसचे तिसरे अधिवेशन विदर्भातील शेंदूरजनाघाट येथे भरले होते त्यावेळी दिनांक 5 फेब्रुवारी 1938 रोजी ना. भा.खरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.

डाॅ ना.भा. खरे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • खरे दर्शन : खंड १, २ (निंदकांना जमालगोटा)
  • दंभस्फोट (मूळ इंग्रजी My Political Memoirs, मराठी संक्षिप्त अनुवाद - आचार्य डाॅ. श्री.प्र. कुलकर्णी) : या खळबळ माजवणाऱ्या ग्रंथात खऱ्यांनी हिंदुस्थानच्या फाळणीला जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या अनीतीचा दंभस्फोट केला आहे.
  • माझी गेली बारा वर्षे उत्तराविना (आत्मकथन)
  • My Defence
  • My Political Memoirs or Autobiography (१९५९)
  • Some speeches and statements of Dr. Khare.
  • हिंदू महासभेचे अधिवेशन

ना.भा. खरे यांच्यावरील पुस्तके[संपादन]

  • ना.भा. खरे यांचे द्विखंडी चरित्र (ज.रा. जोशी)