नासी लमाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नासी लमाक

नासी लमाक (मराठी लेखनभेद: नासी लेमाक ; भासा मलायू, भासा इंडोनेशिया: Nasi lemak ;) ही मलेशिया, ब्रुनेई, सिंगापूर, दक्षिण थायलंडइंडोनेशियाच्या रियाउ बेटांवर प्रचलित असणारी थाळी आहे. मलय भाषेतील नासी म्हणजे भात आणि लमाक म्हणजे मलई /(बहुतकरून) नारळाचे दूध एतदर्थाच्या शब्दांपासून बनलेल्या या नावाचा अर्थ नारळाचे दूध घालून शिजवलेला भात, असा होतो. नारळाच्या दुधात भात शिजवताना त्यात गाठ मारून ठेवलेली पांदानाची पाने सोडतात - त्यामुळे भात सुवासिक होतो. काही वेळा भाताचा सुगंध खुलवण्यासाठी पांदानासह आलेगवती चहादेखील भात शिजवताना घातला जातो. सहसा नासी लमाक या नावाने मिळणाऱ्या थाळीत भातासोबत इकान बिलिस - अर्थात माशांचे सुकट, भाजलेले शेंगदाणे, उकडलेले अंडेसांबाल नावाची तिखट-मसालेदार चवीची चटणी हे पदार्थ हमखास आढळतात. बऱ्याच वेळा थाळीतल्या या नेहमीच्या घटकांसोबत चिकन, रंदांग गोमांस, खुबे (कालवांचा प्रकार), कांकोंग पालेभाजी यांपैकी एखादा पदार्थदेखील समाविष्ट असू शकतो. पारंपरिक पद्धतीने नासी लमाकाचे वाढप करताना लमाक भात व हे अन्य घटक खाद्यपदार्थ केळीच्या पानांवर वाढून त्या पानांची शंक्वाकृती पाकिटे बांधतात.

केळीच्या पानांच्या पारंपरिक "पाकिटात" बांधलेला नासी लमाक.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेतWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.