नारायण फडके
Appearance
ना.सी. फडके याच्याशी गल्लत करू नका.
नारायण फडके (१९३८ - ३ जानेवारी, २०१८) हे एक चित्रपटविषयक वस्तूंचे संग्राहक होते.
फडके यांच्या संग्रहात अंदाजे साडेआठ हजार चित्रपट पुस्तिका, चित्रपटांचे असंख्य पोस्टर्स, शिवाय स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, बालगंधर्व, आचार्य अत्रे, पु. भा. भावे, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे यासारख्या चार हजार स्वाक्षऱ्या आहेत. दत्ता केशव, मधुकर पाठक, राम गबाले, कमलाकर तोरणे, भालजी पेंढारकर, दादा कोंडके, राजदत्त या चित्रकर्मींनी त्यांचा संग्रह वाढविण्यास मदत केली होती. फडके यांनी ५६ वर्षे हा छंद जोपासला होता.
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- नारायण फडके यांच्या या कार्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बरोबरच दूरदर्शनवरील "सुरभी' या मालिकेनेही दखल घेतली होती.
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना "चित्रकर्मी' या मानाच्या पुरस्काराने गौरविले होते.