Jump to content

नामनिर्देशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पारितोषिक मिळण्यासाठी अथवा ठेवीदाराच्या मृत्युनंतर मुदत ठेवीचे पैसे मिळण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे नाव सुचवणे म्हणजे नामनिर्देशन होय.

पारितोषिकासाठी नामनिर्देशन करताना त्या प्रकारचे काम करणाऱ्या काही अजून लोकांचे नामनिर्देशन केले जाते. निर्णय घेणारे मंडळ या नामनिर्देशित लोकांमधून एकाची निवड करून त्याला पारितोषिक जाहीर करते.

मुदत ठेवींचे नामनिर्देशन म्हणजे रकमेची मालकी नामनिर्देशित व्यक्तीला देणे नव्हे. नामनिर्देशित व्यक्ती ही त्या रकमेची फक्त विश्वस्त असते. मृत ठेवीदाराच्या वतीने बँकेकडून पैसे घेण्यासाठी नामनिर्देशित व्यक्ती असतो. त्याने हे पैसे मृताच्या योग्य वारसदाराना देणे अपेक्षित असते.

नामनिर्देशित व्यक्तीचे नाव मुदत ठेवीवर छापावे कि छापू नये याचा निर्णय ठेवीदाराने घ्यायचा असतो. काही घटनांमध्ये नामनिर्देशित व्यक्तीने ठेवीदाराच्या जीवितास धोका केल्याने रिझर्व्ह बँकेने हा पर्याय ठेवीदारास दिला आहे. जर नाव छापायचे नसेल तर बँक फक्त नामनिर्देशन आहे की नाही याचा उल्लेख छापील पावतीवर करते.

फ्ल्याट, मुच्युअल फंड युनिट्स, मुदत ठेवी, बचत खाते तसेच सुरक्षा जमा कक्ष (लॉकर) या साठी सुद्धा नामनिर्देशन करता येते.