नाना महाराज तराणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नाना महाराज तराणेकर
Nana Maharaj Taranekar.jpg
नाना महाराज तराणेकर
मूळ नाव मार्तण्ड शंकर तराणेकर
जन्म १८ ऑगस्ट १८९६
तराणा मध्यप्रदेश
निर्वाण १६ एप्रिल १९९३
नागपूर महाराष्ट्र
उपास्यदैवत भगवान दत्तात्रेय
गुरू वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज

मार्तण्ड शंकर तराणेकर उपाख्य नाना महाराज तराणेकर (जन्म: १८ ऑगस्ट १८९६, तराणा, मध्यप्रदेश - मृत्यू: १६ एप्रिल १९९३, नागपूर, महाराष्ट्र) हे दत्त संप्रदायातील एक संत होते.[१] नाना महाराज हे वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज यांच्या अनुग्रहित शिष्यांपैकी एक होते.[२]

जन्म आणि बालपण[संपादन]

मध्यप्रदेशांतील उज्जैन जवळील "तराणा" या गावी नाना महाराजांचा जन्म शंकरशास्त्री आणि लक्ष्मीबाई याच्या पोटी झाला. शंकर शास्त्री याना वासुदेवानंद सरस्वती यांचा अनुग्रह प्राप्त झालेला असल्याने भक्ती मार्गाची परंपरा नानाच्या घराण्यात पिढीजातच  होती.[३]

कार्य[संपादन]

नानांनी आपले जीवन समाज हितासाठी दिले होते, नाना नामस्मरणाचे महत्त्व आपल्या शिष्यांना समजावून देणे, जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सतत मदतीचा हात देणे आणि अडचणीच्या वेळी योग्य मार्ग दाखविणे, यामुळे नानांचा शिष्यपरिवार विस्तारला आणि या साऱ्या शिष्याना एकत्रित आणण्यासाठी नानांनी त्रिपदी परिवाराची स्थापना केली.[४][५]

नानांनी आपल्या शिष्यांच्या पात्रतेनुसार मार्गदर्शन केले. त्यांनी अापल्या शिष्यांना भक्तिमार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग अशा विविध पद्धतींनी दीक्षा दिल्याची उदाहरणे आहेत. नानांनी करुणात्रिपदी जनमानसात पोहचविण्याचे कार्य केले.[३]


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.संदर्भ[संपादन]

  1. ^ जुवेकर, रोहन. "`नाना’ महाराजांचे दत्त संप्रदायातील योगदान | Saamana (सामना)". www.saamana.com (en-US मजकूर). 2018-05-12 रोजी पाहिले. 
  2. ^ "Shishya Parivar". http://www.shrivasudevanandsaraswati.com (en-gb मजकूर). 2018-05-1२ रोजी पाहिले. 
  3. a b "श्री नानामहाराज तराणेकर (सन १८९६-१९९३) | श्री दत्त महाराज". dattamaharaj.com (en मजकूर). 2018-05-12 रोजी पाहिले. 
  4. ^ "About Tripadi Parivar". nanadham.com (en-gb मजकूर). 2018-03-31 रोजी पाहिले. 
  5. ^ वेबदुनिया. "About Nana Maharaj Taranekar | त्रिपदीचे अध्वर्यु- नानामहाराज तराणेकर" (en मजकूर). 2018-05-12 रोजी पाहिले.