नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागपुर अभियांत्रिकी महाविद्यालय नागपुर
NIT Nagpur
ब्रीदवाक्य प्रगतिपथे नयते तंत्रशिक्षणम्
Type खाजखी महाविद्यालय
Affiliation राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ



नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एन.आय.टी.) किंवा नागपूर अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर हे महाराष्ट्र राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय असून त्याची स्थापना २००८ साली झाली. हे महाविद्यालय नागपूरपासुन १५ कि. मी. असलेल्या नागपुर-काटोल राष्ट्रीय महामार्ग जवळ आहे. महाविद्यालयाने  २६ एकरचा परिसर व्यापला आहे. महाविद्यालयात प्रशासकीय इमारत तसेच कार्यशाळा आहे. प्रत्येक विभागाला स्वतंत्र इमारतीची सोय आहे. विद्यार्थिनी साठी स्वतंत्र वसतिगृहांची निर्मिती केलेली आहे. महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीची मान्यता आहे.