नवरत्न कंपन्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवरत्न हा खिताब १९९७ साली भारत सरकारने देशामधील ९ सर्वात मोठ्या व बलाढ्य सरकारी कंपन्यांना दिला होता. हा शब्द नऊ मौल्यवान खडे नवरत्ने ह्यावरून दिला गेला आहे. आजच्या घडीला भारतामधील सर्व सरकारी कंपन्या (पब्लिक सेक्टर) खालील गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ह्या कंपन्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे विविध गुंतवणूकीचे व स्वायत्ततेचे अधिकार दिले गेले आहेत.

प्रकार[संपादन]

 • महारत्न
  • तीन वर्षे वार्षिक निव्वळ नफा भारतीय रूपया २,५०० कोटी पेक्षा अधिक
  • निव्वळ मुल्य भारतीय रूपया १०,००० कोटी
  • एकूण उलाढाल भारतीय रूपया २५,००० कोटी
 • नवरत्न
  • निव्वळ नफा, निव्वळ मुल्य, उत्पादन क्षमता, उत्पादन खर्च, सेवा खर्च, भांडवल इत्यादी ६ घटकांवर आधारित चाचणीमध्ये १०० पैकी किमान ६० गूण
  • कंपनी नवरत्न बनण्यापूर्वी मिनीरत्न असणे आवश्यक.
 • मिनीरत्न वर्ग-१
  • मागील ३ वर्षे सलग नफा कमवला आहे किंवा एका वर्षात भारतीय रूपया ३० कोटी नफा कमवला आहे
 • मिनीरत्न वर्ग-२
  • बाजार मूल्य शून्याहून अधिक आहे व गेली तीन वर्षे नफा कमवला आहे.

यादी[संपादन]

आजच्या घडीला भारताम्ध्ये ७ महारत्न, १४ नवरत्न, ५३ मिनीरत्न वर्ग-१ तर १६ मिनीरत्न वर्ग-२ कंपन्या आहेत.

महारत्न कंपन्या[संपादन]

 1. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड[१]
 2. कोल इंडिया लिमिटेड [२]
 3. गेल (इंडिया) लिमिटेड[१]
 4. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन [३]
 5. एन.टी.पी.सी. [४]
 6. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन [५]
 7. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड

नवरत्न कंपन्या[संपादन]

 1. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
 2. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
 3. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
 4. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
 5. महानगर टेलीफोन निगम लिमिटेड
 6. नॅशनल ॲल्युमिनीयम कंपनी लिमिटेड
 7. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
 8. नेयवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन
 9. ऑइल इंडिया लिमिटेड
 10. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन
 11. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
 12. राष्ट्रीय इस्पात निगम
 13. रुरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पोरेशन
 14. भारतीय नौवहन निगम

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]