नक्श ल्यालपुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नक्श लायलपुरी
Naqsh Lyallpuri.jpg
जन्म नाव जसवंत राय शर्मा
टोपणनाव नक्श लायलपुरी
जन्म २४ फेब्रुवारी १९२८
ल्यालपुर, (आता फैसलाबाद) पाकिस्तान
मृत्यू २२ जानेवारी २०१७
अंधेरी, मुंबई, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, कवी
अपत्ये

जसवंत राय शर्मा तथा नक्श लायलपुरी (२४ फेब्रुवारी, इ.स. १९२८:फैसलाबाद, पाकिस्तान - २२ जानेवारी, इ.स. २०१७:अंधेरी, मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय गझल आणि बॉलिवूड गीतकार होते.

पुर्व जीवन[संपादन]

शर्मांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२८ रोजी ल्यालपुर (आता फैसलाबाद, पाकिस्तान) मध्ये झाला.[१] त्यांचे वडील यांत्रिकी अभियंता होता आणि जसवंतनेही अभियंता व्हावे अशी त्यांची इच्छा होती. वयाच्या आठव्या वर्षी शर्मा यांच्या आईचा कांजिण्यामुळे मृत्यू झाला. १९४६ साली त्यांनी हिरो प्रकाशने नावाचा एका प्रकाशन गृहात काम केले आणि नंतर काम शोधत ते लाहोरला आले. भारताच्या फाळणी नंतर त्यान्चे कुटुंब लखनौ येथे स्थलांतरीत झाले. नंतर त्यानी "नक्श", (म्हणजे एक ठसा किंवा एक चिन्ह) असे टोपणनावाचा वापर सुरू केला व उर्दू कवी परंपरे प्रमाणे जन्मस्थानावरुन पुढे "ल्यालपुरी" जोडले.[२]

१९५१ मध्ये ते मुंबईत आले आणि एक पुरावा वाचक म्हणून द टाइम्स ऑफ इंडियात काम सुरु केले. कमलेशशी लग्न करुन त्यांना तीन पुत्र बप्पन, राजेंद्र आणि सुनीत आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यान्नी पण "ल्यालपुरी" हे आडनाव स्वीकारले.[३]

काम[संपादन]

१९५० च्या दशकात ल्यालपुरी मुम्बईत आले. त्यानी नाटके लिहिली व त्याची ओळख दिग्दर्शक जग्दिश सेठीशी झाली. १९५३ मधे त्यानी सेठीच्या जग्गू चित्रपटात "अगर तेरी आन्खोसे आन्खे मिला दू" हे गीत लिहिले जे हन्सराज बहल ने सगीतबद्ध केले व आशा भोसले ने गायले होते. १९५३ मधे त्यानी सगीतकार सपन-जगमोहन साठी पजाबी चित्रपट जिजाजी मधे गीत लिहिले. १९७० च्या दशकापरियन्त त्याना यश नाही मिळाले.

गीतकार[संपादन]

गीत लिहिलेली चित्रपट:

म्रुत्यु[संपादन]

ल्यालपुरी यांचे २२ जानेवारी २०१७ ला अंधेरी, मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८८ वयाचे होते.[११]

संदर्भ[संपादन]

 1. a b c d e "Naqsh Lyallpuri: A playlist of his top songs" (इंग्रजी मजकूर). हिंदुस्तान टाइम्स. २२ जानेवारी २०१७. २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
 2. ^ नारायण, हरी (२६ जानेवारी २०१७). "A forgotten lyricist from Punjab" (इंग्रजी मजकूर). द हिंदू. ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
 3. ^ "Old is Gold: Naqsh Lyallpuri (Feb 24,1928 – Jan 22 2017)" (इंग्रजी मजकूर). The Film Writers' Association. २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
 4. ^ झवेरी, हनिफ (2005). "Mehmood, a Man of Many Moods" (इंग्रजी मजकूर). Popular Prakashan. आय.एस.बी.एन. 9788179912133. ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
 5. a b c d भारती प्रधान (२०१६). "Anything But Khamosh: The Shatrughan Sinha Biography" (इंग्रजी मजकूर). Om Books International. २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
 6. a b c d e "Star under a shadow" (इंग्रजी मजकूर). द हिंदू. २१ नोव्हेंबर २०१३. २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
 7. ^ "Late Naqsh Lyallpuri Wrote One of My Most Memorable Ghazals: Lata Mangeshkar" (इंग्रजी मजकूर). News 18. २३ जानेवारी २०१७. ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
 8. ^ भारतन, राजू (२०१६). "Asha Bhosle: A Musical Biography" (इंग्रजी मजकूर). Hay House Inc. पान क्रमांक 103. आय.एस.बी.एन. 9385827162. २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
 9. ^ T.M. Ramachandran (1982). "Film World, Volume 19" (इंग्रजी मजकूर). पान क्रमांक 8. २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
 10. a b "Naqsh Lyallpuri, Urdu poet and lyricist of Ulfat me zamane ki, dies at 89" (इंग्रजी मजकूर). हिंदुस्तान टाइम्स. २२ जानेवारी २०१७. २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले. 
 11. ^ "Naqsh Lyallpuri, renowned Urdu poet and lyricist dies at 88" (इंग्रजी मजकूर). The Financial Express. २२ जानेवारी २०१७. २४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.