Jump to content

नंदादेवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नंदादेवी शिखर

नंदादेवी हे भारताचे उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे व संपूर्णपणे भारतात असलेले सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ७,८१६ मीटर (२५,६४३ फीट) इतकी असून भारताच्या उत्तराखंड या राज्यात आहे. उंची मापनाची तंत्रे अस्तित्वात येई पर्यंत नंदादेवी हेच जगातील सर्वोच्च शिखर असल्याची मान्यता होती. हे शिखर उत्तराखंड हिमालयाची आधार-देवता असल्याची श्रद्धा आहे.