धारिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समांतर-पट धारित्राच्या पटांवरील विद्युतभार व त्यांमधील वर्चोभेद. या दोन गुणधर्मांमधील गणितीय संबंध धारितेने सूचित होतो.

विद्युतचुंबकशास्त्रइलेक्ट्रॉनिकी यांनुसार धारिता (अन्य नावे: धारकता ; इंग्लिश: Capacitance, कॅपॅसिटन्स ;) म्हणजे एखाद्या पदार्थाची विद्युतभार धरून ठेवण्याची क्षमता होय. काही विशिष्ट विद्युतवर्चसाने साठवलेल्या किंवा अलग केलेल्या वैद्युत ऊर्जेचे मोजमाप धारितेतून व्यक्त होते. उदाहरणार्थ, ऊर्जा साठवून ठेवणाऱ्या उपकरणांचे प्रातिनिधिक उदाहरण असलेल्या समांतर-पट धारित्राच्या पटांवरील विद्युतभार +Q व -Q मानल्यास व त्यांच्या दरम्यान V व्होल्ट एवढा वर्चोभेद आहे असे मानल्यास, धारिता खालील समीकरणानुसार मांडली जाते :

फॅराड हे धारितेचे एकक आहे. १ फॅराड म्हणजे प्रति १ कूलॉंब प्रति १ व्होल्ट.