धर्मवीर २
धर्मवीर २: साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट | |
---|---|
दिग्दर्शन | प्रवीण तरडे |
निर्मिती | मंगेश देसाई, साहिल मोशन आर्टस्, झी स्टुडिओज |
कथा | प्रवीण तरडे |
पटकथा | प्रवीण तरडे |
प्रमुख कलाकार | क्षितीश दाते, स्नेहल तरडे |
संवाद | प्रवीण तरडे |
संगीत | अविनाश-विश्वजीत |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ९ ऑगस्ट २०२४ |
अवधी | १७८ मिनिटे |
धर्मवीर २: साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा इ.स. २०२४ मधील एक मराठी चित्रपट असून. हा २०२२ मधील मराठी चित्रपट धर्मवीरचा दुसरा भाग आहे. याची निर्मिती मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्टस् आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.[१]
पार्श्वभूमी
[संपादन]महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावरील निघालेल्या धर्मवीर या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. 'धर्मवीर २’ सिनेमाचं पोस्टर प्रसारित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल व इतर मान्यवर आणि कलाकार उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी सांगितले की, ‘धर्मवीर २’ हा सिनेमा यंदा मराठीसह हिंदीत देखील ९ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.[२]
कथानक
[संपादन]गाणी
[संपादन]कलाकार
[संपादन]- प्रसाद ओक - आनंद दिघे
- क्षितीश दाते - एकनाथ शिंदे
- स्नेहल तरडे -
संदर्भ
[संपादन]- ^ "सज्ज व्हा! शिवसेनेचा वाघ परत येतोय... 'धर्मवीर २'ची रिलीज डेट जाहीर, दुसऱ्या भागात नवीन काय?". दैनिक सकाळ. १ जुलै २०२४ रोजी पाहिले.
- ^ "'धर्मवीर २'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली! 'हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही', सिनेमाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष". दैनिक लोकसत्ता. १ जुलै २०२४ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- आय.एम.डी.बी. मध्ये धर्मवीर २