धनुष्यकोडी अथितन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धनुष्यकोडी अथितन(जन्म:मार्च ६,इ.स. १९५३) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते इ.स. १९८५ च्या पोटनिवडणुकीत आणि इ.स. १९८९,इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मनीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील तिरूचेंदूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्याचप्रमाणे इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते तमिळनाडू राज्यातीलच तिरूनेलवेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.